सिद्धरामय्या होणार सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:41 IST2026-01-07T11:41:18+5:302026-01-07T11:41:18+5:30
कर्नाटकातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा देवराज अर्स यांचा २,७९२ दिवसांच्या विक्रमाची सिद्धरामय्या यांनी मंगळवारी बरोबरी साधली.

सिद्धरामय्या होणार सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री
म्हैसूर : कर्नाटकचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहाण्याच्या देवराज अर्स यांच्या विक्रमाची विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी बरोबरी साधली. मी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही त्यांनी सावधपणे सांगितले.
कर्नाटकातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा देवराज अर्स यांचा २,७९२ दिवसांच्या विक्रमाची सिद्धरामय्या यांनी मंगळवारी बरोबरी साधली. ते उद्या, बुधवारी अर्स यांचा विक्रम मोडणार आहेत.
देवराज अर्स यांचा कार्यकाळ
देवराज अर्स हे कर्नाटकते दोन वेळा मुख्यमंत्री होते. पहिल्या कार्यकाळात २० मार्च १९७२ ते ३१ डिसेंबर १९७७ या कालावधीत २,११३ दिवस, आणि दुसऱ्या कार्यकाळात २८ फेब्रुवारी १९७८ ते ७ जानेवारी १९८० या काळात ६७९ दिवस ते या पदावर विराजमान होते. अर्स यांच्यानंतर पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे सिद्धरामय्या होय.