जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:03 IST2025-11-20T16:03:17+5:302025-11-20T16:03:55+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, SIA ने ही छापेमारी न्यायालयाच्या वॉरंटनंतर केली. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या परिसराची आणि संगणकांची कसून तपासणी केली.

जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि देशविरोधी कारवायांवर सातत्याने प्रहार करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांनी गुरुवारी एक मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (SIA) ने येथील इंग्रजी वृत्तपत्र 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर छापा टाकला. देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे, देशाविरुद्ध द्वेष पसरवणे आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, SIA ने ही छापेमारी न्यायालयाच्या वॉरंटनंतर केली. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या परिसराची आणि संगणकांची कसून तपासणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या झडतीमध्ये सुरक्षा दलांना एके-47 रायफलच्या काही गोळ्या, पिस्तूलचे राऊंड आणि ग्रेनेडचा एक लिव्हर (हँडल) जप्त करण्यात आला आहे.
वृत्तपत्रावर देशाच्या हितांविरुद्धच्या कृत्यांचे 'महिमामंडन' केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी SIA ने एफआयआर दाखल केली असून, 'काश्मीर टाईम्स'च्या संपादकाचे नावही त्यात समाविष्ट आहे. ल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यातीलच ही एक अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकाशन आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची कसून चौकशी केली जाईल. दि