शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

श्री १००८ महावीर समवसरण पंचकल्याण महोत्सव कवठेसार पॅटर्न

By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST

श्री १००८ महावीर समवसरण पंचकल्याण महोत्सव कवठेसार पॅटर्न

श्री १००८ महावीर समवसरण पंचकल्याण महोत्सव कवठेसार पॅटर्न
सुगंधी फूल मातीत पडलं की, त्याच्या स्पर्शाने ती मातासुद्धा सुगंधित होते. सतारीच्या तारेला कलावान बोटांचा स्पर्श होताच ती मधुर स्वराने झंकारू लागते. वसंत ऋतूचे मोरपीस सृष्टीच्या अंगावर फिरू लागले की, ती बहरून येते. अशाच प्रकारे एखाद्या उदात्त विचारांनी प्रेरित झालेली माणसं कवठेसार या गावामध्ये राहतात.
वास्तविक कवठेसार हे शिरोळ तालुक्यातील शहरांपासून दूर असलेले गाव, पण तरीही या गावामध्ये अगदी बहुजन समाजापासून ते सर्व समाजातील तरुण उच्चशिक्षित असून राज्याच्या मोठमोठ्या शहरांमध्ये विविध उच्च पदावर सेवेत आहेत. मराठा, लिंगायत, बहुजन समाज, जैन समाज आणि मुस्लिम समाजातील बांधव हे सर्वजण परस्परावलंबी असून गुण्यागोविंदाने राहतात. मुस्लिम बांधवांचा उरूस असो, विठ्ठल भक्तांचा हरिनाम पारायणाचा सोहळा असो किंवा जैन समाजाचा पंचकल्याणिक पूजा महोत्सव असो अथवा भगवान बुद्ध जयंती असो सर्वजण आनंदाने महोत्सवात सामील होतात हीच या गावची विशेषत: आहे.
जैन धर्मातील तीर्थकरांच्या समवसरणांत गाय आणि वाघ, सिंह आणि हत्ती, साप आणि मंुगूस यासारखे प्राणीही आपलं जन्मवैर विसरून जिनेंद्र भगवतांच्या उपदेशाचं श्रवण करत असतात. भगवानांच्या भक्तीने भावविभोर होत असतात. त्याप्रमाणे सात सय्यद पीर महोत्सव असो, वारकर्‍यांची दिंडी असो किंवा महावीर जयंती असो. सर्व समाज अहिंसा, व्यसनमुक्ती, शाकाहार यांचे अनुकरण व पालन करतो.
याच कवठेसारच्या मातीमध्ये दोन महापुरुष जन्मले. त्यांनी आपल्या कार्यकतृर्त्वाने व शुभकरांच्या विचारांच्या जोरावर आपले व्यक्तिमत्त्व उंचावून तेच साधुत्वाच्या दिव्य जीवनावर आरुढ झाले. या दोन महापुरुषांपैकी पहिले भाऊसो जिन्नाप्पा फरांडे यांचे पुत्र पवनकुमार भाऊसो फरांडे होत. तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या पूर्वाश्रमीच्या पवनकुमार यांनी आपल्या सर्व विकारवासना, मनाचा क्षुद्रकोलाहल यांना शांत करून मनाच्या विलासतेवर विजय मिळविला. संत शिरोमणी श्री आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्याकडून मुनिदीक्षा घेऊन ते सहजसागरजी मुनी महाराज बनले. सूर्याला जन्म देणारी पूर्व दिशा इतर दिशांमध्ये श्रेष्ठ ठरते. त्याप्रमाणे पूज्य सहज सागरजींना जन्म देणार्‍या माता-पिता धन्य आहेत.
संसाराची नश्वरता व असहरता पूर्णपणे जाणून आपले जीवन संयम आणि चारित्र्य यावर आरुढ करणारे श्री जंबू दादा चंदोबा हे दुसरे नररत्न होत. आपले संसारी जीवन व्यापार, व्यवसाय यांनी व्यतीत करून त्यांनी धर्ममोक्ष, पुरुषार्थ साधन्याकरिता प. पू. १०८ श्री अर्हदबली महाराज यांच्याकडून दीक्षा घेऊन १०८ श्री धर्मभूषण महाराज बनले. त्याप्रकारे प. पू. १०८ सहजसागरजी महाराज, १०८ श्री धर्मभूषण महाराज कवठेसारमधून निर्माण झाले. ते कवठेसार या गावचे भूषण व गौरव आहेत. त्यांचा विचार व आचार यांचा वसा व वारसा प्रत्येक नागरिकांनी व तरुणांनी घ्यावा.
- ब्र. राजकुमार चौगले सर
........................................................

भगवान महावीर समवसरण पंचकल्याण महामहोत्सव
परमपूज्य १०८ श्री अर्हदबलीजी महाराज यांचा पावन चार्तुमास कवठेसार याठिकाणी सन २००४ साली संपन्न झाला. या चार्तुमासामध्ये पू. महाराजांनी अनेक शाश्वत व स्थायी स्वरुपाची कामे केली. त्याचेच प्रतीक म्हणजे कीर्तीस्तंभ व समवसरण मंदिराची निर्मिती होय. वास्तविक कवठेसारातील जैन समाज धनवान असून स्वकतृर्त्वाने स्वत:चा संसार सांभाळूनही तो दानधर्मबाबतही अग्रेसर आहे. त्यांनी भगवान महावीर समवसरण मंदिराची निर्मिती करून त्याची पंचकल्याण प्रतिष्ठापूजाही यथाविधी पूर्ण केली.
दि. १२ ते १६ मे २०१४ या कालावधीमध्ये पंचकल्याण महोत्सव सानंद संपन्न होत आहे.
दि. १२ मे २०१४ रोजी गर्भकल्याणिक संपन्न होत आहे. मातीच्या कुशीत दडलेल्या बिजाचे योग्य संरक्षण व संवर्धन करावे त्याप्रमाणे मातेच्या उदरामध्येे असलेल्या गर्भस्थ बालकाचे योग्य संगोपन करून त्याचेच जीवन संस्कारित होण्यासाठी महिलांनी या कालावधीमध्ये सत्वशील जीवन जगावे. धार्मिक क्रिया कराव्यात.
दि. १३ मे २०१४ रोजी जन्मकल्याणिक संपन्न होत आहे. यादिवशी सौधर्म इंद्र आपल्या इंद्राणीसहित जिन बालकास पांडूकशिलेवर नेऊन त्याचे प्रक्षालन करतो.
दि. १४ मे २०१४ रोजी राज्याभिषेक व दीक्षाकल्याणिक संपन्न होत आहे. महावीरांनी आपल्या वयाची तीस वर्षे सुखाने व्यतीत केली, पण अखेर त्यांच्या विलासतेवर वैराग्याने विजय मिळविला. क्रोध, मान, माया, लोभ हेच खरे मानवाच्या दु:खाला कारणीभूत असून यामुळे मानवाच्या सुखाचा नाश होतो. आपल्या तुच्छ विचार, वासनावर नियंत्रण ठेवून महावीरांनी आत्मसुखासाठी जीनदीक्षा घेतली.
दि. १५ मे २०१४ रोजी केवलज्ञानकल्याणिक संपन्न होत असून यादिवशी मुनी महावीरांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली. अंधाराचे वेष्ठण फाडून हसत येणार्‍या सूर्याप्रमाणे अनेक उपसर्गांच्या दिव्यातून महावीरांचे जीवन अधिकच तेजाळून निघाले.
मानव आपल्या निंद्य आणि हीन कुकर्माने पापाच्या जाळ्यात गुरफुटून जातो आणि आपल्यावर येणार्‍या दु:खाचे खापर मात्र इतरांवर फोडतो. मनाचा उद्रेक शांत करून आपल्या आत्मिक अनंत वैभवाला तपश्चर्येच्या जोरावर मानव महामानव बनू शकतो.
दि. १६ मे २०१४ रोजी निर्वाणकल्याणिक व १००८ कलशाभिषेक यांचा कार्यक्रम होणार आहे.
जीवन जगत असताना मनुष्य जेव्हा सर्वांवर प्रेम करत व सर्वांना आनंद देत असतो तेव्हा त्याच्या जीवनाचा भावगंध त्याच्यानंतरही तो पुसला जात नाही. ज्यांच्या जगण्याला ताल आणि तोल आहे. माणुसकीचे व प्रेमाचे मोल आहे अशी माणसे मृत्यूनंतरही जगत असतात. भगवान महावीरही अशाच प्रकारे जगले आणि त्यांच्या निर्वाणानंतरही आजही चिरतरुण आहेत.
आज मानव ईर्षा, क्रोध, अहंकार, मत्सर यासारख्या विकारांनी ग्रस्त आणि त्रस्त झाला आहे. एखाद्या जुनाट आणि पडक्या घरात उंदीर आणि घुशीने ठिकठिकाणी बिळे करावीत त्याप्रमाणे मानवी मन क्षुद्र विचार, वासना यांनी बरबटल्या आहेत. गरजत्या सागरांच्या लाटावरही मानवाला घर बांधणे शक्य आहे. रानटी हत्तीलाही जेरबंद करणे शक्य आहे. विषारी भुजंगाचे दात पाडणे शक्य आहे, पण आज मानवाला त्याच्या आयुष्यात आणि त्याच्याच मनात असलेल्या विकारवासनांच्या नागिणी त्याला ठेचता येत नाहीत. हे आजच्या बुद्धिमान समजल्या जाणार्‍या माणसांचा वेडेपणा नाही का?
आपल्या उदात्त चारित्र्याने, शुभंकर विचाराने आपल्या सौंदर्यपूर्ण कृतीने आपले व्यक्तिमत्त्व उन्नत करावे. हाच बोध या पंचकल्याण पूजा महोत्सवातून प्रत्येक मानवाने घ्यावा.
- ब्र. राजकुमार चौगुले सर.