शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

'आधी तुमची पदवी दाखवा', मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची उडवली खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 5:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची विरोधकांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर 'परीक्षा पे चर्चा 2020' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमापूर्वीच सिनेअभिनेता प्रकाश राज यांनी मोदींवर टीका केली. परीक्षा पे चर्चा करण्यापूर्वी पदवी प्रमाणपत्र दाखवा, असा टोला प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची विरोधकांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. तर, सोशल मीडियातूनही काही ट्रोलर्संकडून मोदींच्या या कार्यक्रमावर टीका करण्यात येत आहे. याचदरम्यान, प्रकाश राज यांनीही ''परीक्षा पे चर्चा 2020 करने से पहले डिग्री का कागज दिखाओ'', असे ट्विट करत मोदींना लक्ष्य केले. प्रकाश राज यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामध्ये मोदींना ट्रोल करणाऱ्या आणि राज यांचं समर्थन करणाऱ्याही प्रतिक्रिया आहेत. 

दरम्यान, 'परीक्षांवर चर्चा' करणाऱ्या पंतप्रधानांनी रोजगारावर सुद्धा चर्चा करावी' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. मोदींनी, परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं राहावं याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहता पंतप्रधान मोदी आता तरुणांच्या रोजगारासंबंधात चर्चा कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असल्याचा टोला राष्ट्रवादीने मोदींना लगावला आहे.दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे केलेले सगळे दावे फोल ठरले. प्रत्यक्षात, फक्त चार लाख युवकांना रोजगार मिळाला. तरूणांना पकोडे तळण्याचा अजब सल्ला देण्यात आला. देशात बेरोजगारी लक्षणीयरित्या वाढली आहे. आहेत तेच रोजगार जात आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरूणांना रोजगार मिळेल का याची शाश्वती नसल्याने रोजगारनिर्मिती संबंधी ठोस पावले उचलून मोदींनी तरूणांशी संवाद साधणे अपेक्षित असल्याची मागणीही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थीexamपरीक्षा