शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शो बिझनेस विषारी! कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 10:03 IST

हिमाचल प्रदेशमधील घरी परतल्यानंतर कंगनाने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. हा शो बिझनेस विषारी आहे अशी टीका तिने केली आहे.

मनाली - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेट यावरून महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर बेछूट टीका केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. दरम्यान, घरी परतल्यानंतर कंगनाने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. हा शो बिझनेस विषारी आहे अशी टीका तिने केली आहे.आपल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, शो बिझनेस पूर्णपणे विषारी आहे. प्रकाशाचा झगमगाट आणि कॅमेऱ्याचे हे जग कुणाचेही जीवन चालवण्याचे आणि आभासी वास्तवावर विश्वास ठेवायला देते, याची जगाला जाणीव करूव देते. या आभासीपणाची जाणीव होण्यासाठा अध्यात्मिकदृष्ट्या भक्कम असणे आवश्यक आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप होत आहेत. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कंगना आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्धा टोकाला पोहोचले होते. तसेच या दरम्यान मुंबईला पीओकेची उपमा देणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने बुलडोजर चालवला होता.काही लोकांमुळे चित्रपटसृष्टी दोषी ठरत नाही  चित्रपटसृष्टीही अमली पदार्थांवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संसदेत सोमवारी केलेले भाजपचे रवी किशन यांच्यावर समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी टीका केली. रवी किशन हे अभिनेते व उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असे सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत. रवी किशन यांचे वक्तव्य हे सध्या देशाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी या विषयावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आहे, असा आरोपही बच्चन यांंनी केला."एके दिवशी अभिषेक फासावर लटकला असता तर..." बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावरुन ती बिनधास्तपणे आपली मुद्दे मांडत असते. आता तिने केलेलं ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कंगना राणौतनंबॉलिवूड महानायक बिग बी यांची पत्नी खासदार जया बच्चन यांच्या टीकेला आक्रमक उत्तर दिलं आहे. राज्यसभेत मंगळवारी जया बच्चन यांनी नाव न घेता कंगनावर निशाणा साधला होता.याबाबत कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''जया जी, तुम्ही तेव्हाही असंच बोलला असतात का जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला टीएनेजमध्ये मारहाण झाली असती, ड्रग्स दिलं गेले असतं आणि छेडछाड केली असती? तुम्ही त्यावेळीही हे बोलला असतात का जेव्हा अभिषेक बच्चनला त्रास दिला जात असता आणि एके दिवशी तो फासावर लटकलेला दिसला असता? आमच्याबद्दलही सहानुभूती दाखवा.'' 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतbollywoodबॉलिवूडIndiaभारत