पाटणा : बिहार सरकारने पाटण्यातील शासकीय आरोग्य आणि शारीरिक शिक्षण महाविद्यालयास अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या वडिलांचे नाव दिल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप नेते अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. या निर्णयाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी राज्य सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत स्वकीयांवर शरसंधान साधण्याची संधी सोडली नाही.मंगळवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्व. बी. पी. सिन्हा यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. २००९-१० पासून हा प्रस्ताव कला, सांस्कृतिक आणि युवक कल्याण विभागाकडे रेंगाळत पडला होता. त्यावेळी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजप घटक पक्ष होता. तसेच या खात्याचा मंत्री भाजपचा होता. त्यामुळे या निर्णयास महत्त्व प्राप्त होते. (वृत्तसंस्था)
‘शॉटगन’ शत्रुघ्न यांचे स्वकीयांवर शरसंधान
By admin | Updated: August 19, 2015 22:56 IST