थोडक्यात पा
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
हल्ल्याचा निषेध
थोडक्यात पा
हल्ल्याचा निषेधसंयुक्त राष्ट्रसंघ : संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी पाकिस्तानात निरपराध नागरिकांना सतत लक्ष्य करण्यात येत असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून त्यांनी पाक सरकारला दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न दुप्पट करण्याचे आवाहन केले. तैवानमध्ये भूकंपतैपेई : तैवानमध्ये शनिवारी पहाटे ५.९ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. तैतुंग शहरापासून २५ कि. मी. अंतरावर स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी चार वाजून सहा मिनिटांनी हा भूकंप झाला. पोलिओ कार्यकर्ते बेपत्ताइस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात तीन पोलिओ कार्यकर्ते व त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात दोन कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. जोब जिल्ह्याच्या मुर्घा किबजाई येथे शुक्रवारी ही घटना झाली. दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केल्याची शक्यता आहे. खमेनींचे ओबामांना पत्रवॉशिंग्टन : अण्वस्त्र करारावर चर्चा सुरू असताना इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खमेनी यांनी अमेरिकेच्या पुढाकाराबद्दल अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना गोपनीय पत्र पाठवले आहे. ऑक्टोबर महिन्यात हे पत्र पाठविण्यात आल्याचे इराणच्या एका मुत्सद्याने सांगितले. कट उधळलामॉन्ट्रियल : कॅनडात व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी गोळीबार करण्याचा कट उधळून लावल्याचा दावा कॅनडा पोलिसांनी केला आहे. हल्लेखोर आत्महत्या करण्यापूर्वी गोळीबार करणार होता. टिंबरेला येथील तरुणाने एका तरुणीच्या साथीने हेलिफँक्समध्ये गोळीबाराचा कट रचला होता. १६ जणांना पकडलेबोगोटा : कोलंबियात घुसखोरी करून अमेरिकेला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या १६ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. पनामा व मध्य अमेरिकामार्गे ३२०० कि. मी.चा प्रवास करून ते अमेरिकेला जाऊ इच्छित होते. कोलंबियाच्या मेडेलिन शहरात या तिघांना जेरबंद करण्यात आले. इटलीचा सल्लारोम : इटलीने आपल्या नागरिकांना लिबियाला न जाण्याची, तसेच तेथील नागरिकांना लिबिया सोडण्याचा सल्ला दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने लिबियात हस्तक्षेप केल्यास आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही इटलीने म्हटले आहे.