दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:51 IST2025-11-17T14:38:34+5:302025-11-17T14:51:34+5:30
दिल्ली किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात मोठी माहिती समोर आली आहे. आता बुटाचा अँगल समोर आला आहे.

दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
दिल्लीतीलस्फोट प्रकरणी दररोज नवीन खुलासा होत आहे. आता सुरक्षा एजन्सींना आणखी एक नवीन माहिती मिळाली आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद हा एक बूट बॉम्बर होता. त्याने त्याच्या बुटांमध्ये लपवलेल्या धोकादायक स्फोटक TATP चा वापर करून हल्ला केला होता. तपास पथकाला स्फोटस्थळी एका कारच्या ड्रायव्हरच्या सीटवरून एक बूट सापडला, यामध्ये धातूचा पदार्थ होता.
स्फोटाच्या ठिकाणी उमर मोहम्मद याच्या i20 कारच्या उजव्या बाजूच्या ड्रायव्हरच्या सीटखाली एक बूट सापडला. हाच प्राथमिक ट्रिगर असल्याचा संशय आहे. यामधून स्फोट झाल्याचे समोर आले आहे.
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
स्फोटाचे पुरावे मिळाले
फॉरेन्सिक तपासणीत स्फोटस्थळी टायर आणि शूजमधून TATP चे अवशेष सापडले आहेत. जैशच्या दहशतवाद्यांनी मोठा स्फोट घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात TATP जमा केले होते, असा संशय सुरक्षा एजन्सींचा आहे. हल्ल्यात अमोनियम नायट्रेटमध्ये मिसळलेले TATP वापरल्याची पुष्टी यापूर्वी झाली आहे. शिवाय, कारच्या मागील सीटखाली स्फोटकांचे पुरावे सापडले आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या कटासाठी २० लाख रुपये अटक केलेल्या महिला डॉक्टर शाहीन मार्फत मॉड्यूलला देण्यात आले होते, हे तपासात समोर आले आहे. शाहीनने निधी आणि रसद पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. एनआयए आता संपूर्ण नेटवर्क - नियोजन, पैसा आणि पुरवठा साखळी - उघड करण्यासाठी काम करत आहे. ही पद्धत डिसेंबर २००१ मध्ये रिचर्ड रीड प्रकरणासारखीच आहे, त्यावेळी पॅरिसहून मियामीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात TATP वापरून बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न एका बूट बॉम्बरने केला होता. उमरनेही असाच प्रयत्न केला आहे.
TATP काय आहे?
TATP हे एक शक्तिशाली स्फोटक आहे. हे एसीटोन आणि हायड्रोजन पेरोक्साइडच्या मिश्रणापासून बनवले जाते. हा रंगहीन, गंधहीन आणि स्फटिकासारखा पदार्थ अगदी किरकोळ धक्क्याने किंवा उष्णतेनेही स्फोट होऊ शकतो. त्याचा वापर अत्यंत धोकादायक आहे.