शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

VIDEO- रामलीला मैदानावर एकानं मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भिरकावला बूट  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 10:23 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री भाषण करत असताना एका व्यक्तीनं फडणवीस यांच्या दिशेनं बूट भिरकावला आहे.

नवी दिल्ली-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री भाषण करत असताना एका अज्ञात व्यक्तीनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेनं बूट भिरकावला आहे. त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताना कार्यकर्त्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणा सुरू केल्या. त्याचवेळी एक बूट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भिरकावण्यात आला आहे. सुदैवानं तो कोणालाही लागला नाही.मुख्यमंत्री लगेच भाषण आटोपून व्यासपीठावरून निघून गेले. हा आंदोलनकर्ता राजस्थानचा होता. राजकुमार सोनी असे या आंदोलनकर्त्याचे नाव आहे. त्यानं कोणत्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बूट भिरकावला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

अण्णा आणि नरेंद्र मोदींचं भ्रष्टाचारमुक्तीचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य केल्या आहेत. कृषिमूल्य आयोगाला आणखी अधिकार देणार आहोत, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.अण्णा हजारेंना पुन्हा आंदोलन करावं लागणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. अण्णा हजारे यांनी अखेर सात दिवसांनी उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अखेर यश मिळालं असून, अण्णांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना लिंबू पाणी पाजलं आहे.कृषी अवजारांचा जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवर आणणार असल्याचंही केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. तसेच तीन महिन्यांत अंमलबजावणीचं आश्वासन दिलं आहे. लोकपालबाबत कालमर्यादा देण्याची मागणी मान्य केली आहे. अण्णा हजारेंच्या मागण्यांसंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केलाय. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसanna hazareअण्णा हजारे