धक्कादायक! तरुणाने सापाला पकडले, चावून तुकडे करत ठार मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 23:16 IST2023-05-22T23:15:54+5:302023-05-22T23:16:05+5:30
Crime News: एका तरुणाने जिवंत सापाला पकडले. त्यानंतर त्या सापाला जंगलात सोडण्याऐवजी चावून त्याचे तुकडे करत ठार मारले.

धक्कादायक! तरुणाने सापाला पकडले, चावून तुकडे करत ठार मारले
उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. येथे एका तरुणाने जिवंत सापाला पकडले. त्यानंतर त्या सापाला जंगलात सोडण्याऐवजी चावून त्याचे तुकडे करत ठार मारले. दरम्यान, तिथे असलेल्या लोकांनी या प्रकराचा व्हिडीओ बनवला आहे. वन विभागाची टीम आरोपीबाबत माहिती मिळवत आहे. तसेच त्यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना लालकुआं कोतवाली क्षेत्रातील नगिना कॉलनी येथे घडली आहे. रेल्वेच्या जमिनीवर बनवण्यात आलेली ही अवैध कॉलनी हटवण्यात येत आहे.
रविवारी अतिक्रमण हटवत असताना एक घर तुटल्यावर तिथून एक साप बाहेर आला. तिथे असलेल्या एका तरुणाने या सापाला पकडले. तो तरुण बराच वेळ या सापाला पकडून होता. घर तुटल्याने हा तरुण संतप्त झाला होता. त्याचा राग त्याने या सापावर काढला. त्याने सापाला तोंडात जिवंत पकडून त्याचे चावून तुकडे केले. तिथे असलेल्या लोकांनी त्याला तसे करू नको, म्हणून सांगितले. मात्र त्याने कुणाचेही ऐकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचं नाव कमलेश असं असून, त्याने नशेमध्ये असताना हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवला आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत वनपालांनी सांगितलं की, व्हिडीओचा तपास केला जात आहे. सापाचे चावून तुकडे करणाऱ्या तरुणाबाबत माहिती मिळवली जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तरुणाविरोधात कारवाई केली जाईल. त्यांनी सांगितले की, हा तरुण सापाला कशाप्रकारे पकडत आहे आणि नंतर त्याचा चावा घेत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे.