धक्कादायक! सिक्युरिटी ऑफिसरनेच व्हायरल केले विद्यार्थिनींचे फोटो, अनेक मुलींना केलं ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:21 IST2023-08-18T17:20:26+5:302023-08-18T17:21:21+5:30
Crime News: राजस्थानमधील अजमेरच्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या सिक्युरिटी ऑफिसरवर विद्यार्थिनींचे फोटो काढल्याचा आणि ते व्हायरल केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांनी काल रात्री आंदोलनही केलं.

धक्कादायक! सिक्युरिटी ऑफिसरनेच व्हायरल केले विद्यार्थिनींचे फोटो, अनेक मुलींना केलं ब्लॅकमेल
राजस्थानमधील अजमेरच्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या सिक्युरिटी ऑफिसरवर विद्यार्थिनींचे फोटो काढल्याचा आणि ते व्हायरल केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांनी काल रात्री आंदोलनही केलं. आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये तोडफोड केली. युनिव्हर्सिटीमध्ये वाद वाढत असल्याचे पाहून पोलीस आणि प्रशानसाने प्रकरणाची दखल घेतली. या सिक्युरिटी अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.
व्हायरल फोटोंबाबत आंदोलन आंदोलन करत असलेल्या विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने सांगितले की, सिक्युरिटी ऑफिसरने विद्यार्थिनींचे फोटो काढून त्यांची माहिती काढतो. या सिक्युरिटी ऑफिसरने अनेक मुलीचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.
मात्र यावेळी कॉलेजमधील एका विद्यार्थिनीने संपूर्ण घटनाक्रम आपल्या सहकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केले. आरोपा झालेल्या सिक्युरिटी ऑफिसरला पदच्युत करण्यात यावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री एक वाजेपर्यंत आंदोलन केलं.
अजमेर युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला, तेव्हा प्रशासनाने तपास सुरू केला. या प्रकरणी एफएसएल टीम तपास करत आहेत. तर सिक्युरिटी ऑफिसर राजपाल रेवाड याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी प्रसारमाध्यमांना पीडितांशी बोलू दिलं जात नाही आहे. त्यामुळे सेंट्रल युनिव्हर्सिटी प्रशासन काही लपवत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.