धक्कादायक! नव विवाहितेला शरीर संबंधांसाठी आधी पैसे देऊ केले, नकार दिला तर तरुणाने बलात्कार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 19:41 IST2024-08-31T19:40:46+5:302024-08-31T19:41:05+5:30

जेव्हा पती घरी परतला तेव्हा पीडितेने ही बाब त्याला सांगितली. यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले.

Shocking! The newly married woman was first offered money for sex, if she refused, the young man raped her in UP Bhadohi | धक्कादायक! नव विवाहितेला शरीर संबंधांसाठी आधी पैसे देऊ केले, नकार दिला तर तरुणाने बलात्कार केला

धक्कादायक! नव विवाहितेला शरीर संबंधांसाठी आधी पैसे देऊ केले, नकार दिला तर तरुणाने बलात्कार केला

उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये नवविवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तिच्याच घरात तिला सेक्ससाठी पैशांचे आमिष दाखविण्यात आले, तिने यास नकार दिला तेव्हा तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

पीडित नवविवाहिता ही २० वर्षांची आहे. तर आरोपी राहुल हा २८ वर्षांचा आहे. सोमवारी सायंकाळी पती कामानिमित्त बाहेर गेलेला असताना ही घटना घडली आहे. आरोपीने आधी या महिलेला पैसे देऊन अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले, तिने त्यास विरोध केला असता तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलीस ठाण्याचे अंमलदार सच्चिदानंद पांडे यांनी सांगितले. 

जेव्हा पती घरी परतला तेव्हा पीडितेने ही बाब त्याला सांगितली. यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भदोहीमध्ये आणखी एक बलात्काराचा प्रकार घडला आहे. एका नर्सने लॅब टेक्निशियनविरुद्ध तक्रार केली आणि त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन अनेक वर्षे तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 36 वर्षीय नर्सने 59 वर्षीय वृद्धावर हे आरोप केले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Shocking! The newly married woman was first offered money for sex, if she refused, the young man raped her in UP Bhadohi