धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:47 IST2025-11-21T14:47:15+5:302025-11-21T14:47:45+5:30

डॉक्टर शाहीन हिचे थेट जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदाच्या हँडलर्सशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

Shocking revelation! Doctor Shaheen turns out to be the mastermind of terrorist funding; Transactions worth crores through Bitcoin and Hawala | धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार

धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार

फरीदाबाद-सहारनपुर मॉड्यूलमध्ये सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासात एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. या मॉड्यूलमध्ये पकडलेल्या डॉक्टर शाहीन हिचे थेट जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदाच्या हँडलर्सशी संबंध असल्याचे समोर आले आहे. दहशतवादी कारवायांसाठी या डॉक्टरला बिटकॉइन आणि हवालामार्फत लाखो रुपयांचा निधी मिळाल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

डॉक्टर शाहीनच दहशतवादी फंडिंगची प्रमुख सूत्रधार

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनची तपासणी आणि कसून चौकशी केल्यानंतर डॉक्टर शाहीन हिची भूमिका दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करणारी म्हणजेच मुख्य फंडर म्हणून स्पष्ट झाली आहे.

बिटकॉइनद्वारे झाले व्यवहार

समोर आलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदाच्या हँडलर्सकडून डॉक्टर शाहीनला बिटकॉइनच्या माध्यमातून तब्बल ९ लाखांहून अधिक रक्कम पाठवण्यात आली होती. 'पी२पी' पद्धतीने शाहीन ही रक्कम १० हून अधिक बँक खात्यांमध्ये काढली गेली होती. याशिवाय, सौदी अरेबिया, तुर्कि आणि सीरियामधूनही डॉक्टर शाहीनला हवालामार्फत ६ लाखांहून अधिक रुपये मिळाल्याचे समोर आले आहे.

रुग्णालय बांधण्याच्या नावाखाली गोळा केली वर्गणी 

चौकशीमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण बाब उघड झाली आहे. डॉक्टर शाहीन केवळ बाहेरून निधी स्वीकारत नव्हती, तर ती स्वतःही या मॉड्यूलसाठी वर्गणी गोळा करत होती. लोकांना ती सांगायची की हा पैसा मुसलमानांसाठी स्वस्त दरात उपचार देणारे रुग्णालय बांधण्यासाठी गोळा केला जात आहे. या निधीशिवाय, डॉक्टर शाहीनने तिच्या स्वतःच्या कमाईतूनही ४ लाख रुपये या मॉड्यूलच्या दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवले होते, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

१० दिवसांच्या चौकशीतून भूमिका निश्चित

१० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या १० दिवसांच्या कसून चौकशीतून या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींची भूमिका निश्चित करण्यात आली आहे. डॉक्टर शाहीनची भूमिका ही पैसे गोळा करणे आणि हँडलर्सकडून आलेला निधी वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवणे होती. तर उमरची भूमिका ही या पैशाचा वापर करून स्फोटके आणि केमिकल्स खरेदी करणे, बंद खोलीत केमिकल्सपासून स्फोटके तयार करणे, त्यांची चाचणी घेणे आणि फिदायीन हल्ल्यांसाठी वाहने खरेदी करणे होते.

सध्याच्या तपासामध्ये, डॉक्टर शाहीनचा थेट जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची बहीण सादिया अजहर किंवा मारला गेलेला दहशतवादी उमर फारूकची पत्नी अफ़ीरा फारूक यांच्याशी थेट संपर्क असल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

Web Title : डॉक्टर शाहीन: बिटकॉइन, हवाला के ज़रिये आतंकी फंडिंग की मास्टरमाइंड

Web Summary : डॉक्टर शाहीन जैश-ए-मोहम्मद और अल-कायदा से जुड़ी आतंकी फंडिंग की मास्टरमाइंड निकलीं। बिटकॉइन और हवाला के ज़रिये फंड प्राप्त किया, अस्पताल परियोजना के नाम पर दान लिया और अपनी कमाई आतंकी गतिविधियों में निवेश की। जांच जारी है।

Web Title : Doctor Shaheen: Mastermind of Terror Funding via Bitcoin, Hawala

Web Summary : Doctor Shaheen emerged as a key terror funder, linked to Jaish-e-Mohammed and Al-Qaeda. She received funds via Bitcoin and Hawala, using donations for a false hospital project and investing her own money in terror activities. Investigation is ongoing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.