रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 20:40 IST2025-10-09T20:39:27+5:302025-10-09T20:40:22+5:30
Punjab Shocking News: पंजाबमधील मोगा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली.

रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
पंजाबमधील मोगा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली, जिथे एका पतीने आपल्याच पत्नीला ड्रग्जचे व्यसन लावून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मोगा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचे तीन वर्षांपूर्वी गौरव नावाच्या तरुणाशी लग्न झाले. सुरुवातीला त्यांचे वैवाहिक जीवन सामान्य होते. मात्र, लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतर पती गौरवचा खरा चेहरा उघड झाला. महिलेने पोलिसांना सांगितले की, सुमारे एक वर्षापूर्वी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तिच्या पतीने तिला ड्रग्जचे व्यसन लावले. ती पूर्णपणे व्यसनाधीन झाल्यानंतर, त्याने तिला ग्राहकांकडे पाठवण्यास सुरुवात केली. आरोपी पती स्वतः क्लायंटशी संपर्क साधत असे आणि कधीकधी तो तिला हॉटेलमध्येही सोडायचा. हा भयानक प्रकार सुमारे वर्षभर सुरू होता.
काही दिवसांपूर्वी ही महिला दारूच्या नशेत रस्त्यावर अचेत अवस्थेत पडलेली आढळली. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तिला त्वरित रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर महिलेने आपल्या कुटुंबाला तिची संपूर्ण आपबीती सांगितली. संपूर्ण कहाणी ऐकून कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
आरोपी पतीला अटक
डीएसपी सिटी गुरप्रीत सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या गंभीर तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पती गौरवला अटक केली. आरोपीविरुद्ध अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घेत आहेत.