शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

धक्कादायक! राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत, देशातील १० हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची चीनकडून हेरगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 8:38 AM

देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देचीनचे भारताविरोधातील मोठे कारस्थान उघडकीसदेशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची चीनकडून हेरगिरी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडलेले आहेत. लडाखमधील पाँगाँग त्सो परिसरात चिनी सैन्य घुसखोरीचे वारंवार प्रयत्न करत असल्याने वातावरण अगदीच स्फोटक बनलले आहे. त्यातच आता चीनचेभारताविरोधातील मोठे कारस्थान उघडकीस आले आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अशा देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. चीन सरकार काही कंपन्यांच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच शेनजेन ही कंपनी भारतात तब्बल १० हजार लोकांची हेरगिरी करत असून, या कंपनीचा चीन सरकार आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी थेट संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने टिकॉटॉकसह शेकडो चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही हेरगिरी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.झेनझुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड या कंपनीकडून ही हेरगिरी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह, भारताचे सरन्यायाधीश, सोनिया गांधी, गांधी कुटुंबीय, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, नवीन पटनाईक, कॅप्टन अमरिंदर सिंह, शिवराज सिंह चौहान, शरद पवार यांच्यासारख्ये बडे नेते. राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि अन्य केंद्रीय मंत्री, सीडीएस बीपीन रावत यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच रतन टाटा यांच्यासह अनेक उद्योगपतींचीही डिजिटल हेरगिरी करण्यात आली आहे.चिनी कंपन्या या व्यक्तींची डिजिटल लाइफ फॉलो करत आहे. तसेच या व्यक्ती आणि त्यांचे पाठीराखे कशाप्रकारे काम करतात, यावर लक्ष ठेवले जात आहे. चिनी कंपन्या या सर्वांचा रियल टाइम डेटा एकत्रित करत आहेत. ही माहिती चीन सरकारला पुरवली जात आहे. राजकीय व्यक्ती आणि व्यावसायिकांसोबतच खेळाडू, पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईंकांवरही लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचीही हेरगिरी केली जात आहे.शेनजान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मने चीन सरकार आणि कम्युनिस्ट पार्टीसोबत मिळून ओव्हरसीसचा एक इन्फॉर्मेशन डाटाबेस बनवला आहे. त्याअंतर्गत ही संपूर्ण काम केले जाते, असा दावा इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या या वृत्ता करण्यात आला आहे. तसेच कंपन्यांकडून मिळवण्यात येत असलेल्या या माहितीला चिनी कंपन्यांकडून हायब्रेड वॉर असे नाव देण्यात येते. एकीकडे एलएसीवर चिनी सैन्य भारतील लष्कराला युद्धासाठी चिथावणी देत आहे. तर दुसरीकडे चिनी कंपन्या भारताविरोधात डिजिटल युद्ध करत असल्याचे या माहितीवरून समोर येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदUddhav Thackerayउद्धव ठाकरे