धक्कादायक...दुबईहून येणाऱ्या विमानात प्रवासी विवस्त्र फिरू लागला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 21:48 IST2018-12-29T21:46:36+5:302018-12-29T21:48:01+5:30

या सर्व प्रकारानंतर विमान पुन्हा दुबईला रवाना झाले. 

Shocking ... the passenger strips on air india plane | धक्कादायक...दुबईहून येणाऱ्या विमानात प्रवासी विवस्त्र फिरू लागला...

धक्कादायक...दुबईहून येणाऱ्या विमानात प्रवासी विवस्त्र फिरू लागला...

लखनऊ : दुबईहून लखनऊला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये एक प्रवासी अचानक सर्व कपडे काढून विवस्त्र फिरत होता. या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांसह क्रू मेंबरनाही धक्का बसला. अखेर त्याच्यावर ब्लँकेट गुंडाळून जागेवर बसविण्यात आले. 


एअर इंडियाचे एक्प्रेस हे दुबईहून लखनऊला शनिवारी विमान येत होते. यावेळी मध्यातच हा प्रकार घडला. आय एक्स- 194 या विमानामध्ये 150 प्रवासी होते. या प्रवाशाला दोन क्रू मेम्बरनी धरून ठेवले. त्यानंतर त्याच्याभोवती ब्लँकेट गुंडाळून जागेवर बसविले. अखेर लखनऊ विमानतळावर आल्यावर त्याला विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले. 




या प्रवाशाने असे का केले याबाबत खुलासा होऊ शकला नाही. या सर्व प्रकारानंतर विमान पुन्हा दुबईला रवाना झाले. 

Web Title: Shocking ... the passenger strips on air india plane