हृदयद्रावक! आधी आई, बाबा आणि मग भाऊ; अवघ्या ५ दिवसात कोरोना योद्ध्याचं कुटूंब होत्याचं नव्हतं झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 04:19 PM2020-11-24T16:19:14+5:302020-11-24T16:31:57+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या विळख्यात अडकल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटूंब होत्याचे नव्हते झाले आहे. 

Shocking news gujarat cop loses 3 family members to the virus in 5 days | हृदयद्रावक! आधी आई, बाबा आणि मग भाऊ; अवघ्या ५ दिवसात कोरोना योद्ध्याचं कुटूंब होत्याचं नव्हतं झालं

हृदयद्रावक! आधी आई, बाबा आणि मग भाऊ; अवघ्या ५ दिवसात कोरोना योद्ध्याचं कुटूंब होत्याचं नव्हतं झालं

googlenewsNext

कोरोनाने गेल्या १० महिन्यांपासून संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. अजूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाकाळात, लॉकडाऊनमध्ये लोक आपापल्या घरात बंद असताना कोरोनायोद्ध्यांनी रात्रंदिवस कर्तव्य करत आपली जबाबदारी पूर्ण केली. दरम्यान  कोरोनोयोद्ध्यांना अनेक गंभीर प्रसंगांचा सामना करावा लागला होता. अशीच एक धक्कादायक घटना अहमदाबादमधून समोर येत आहे. 

अहमदाबादमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या धवल रावल यांच्या कुटुंबात कोरोनामुळे ५ अवघ्या  दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला. धवल रावल स्वतः एक कोरोना वॉरियर्स असून अहमदाबादमध्ये नोकरीसाठी कार्यरत आहेत. कोरोनाच्या विळख्यात अडकल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटूंब होत्याचे नव्हते झाले आहे. 

गेल्या पाच दिवसात धवल रावल यांच्या आईला, वडिलांना आणि नंतर भावाला मृत्यूचा सामना करावा लागला आहे. सगळ्यात आधी धवल रावल यांच्या आईला नंतर वडिलांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ठाकरनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा सिव्हिल रुग्णालयामध्ये  दाखल करण्यात आले. या सगळ्यात धवल यांच्या भावालाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलासादायक! भारतात सगळ्यात आधी 'या' १ कोटी लोकांना कोरोनाची लस देणार; लसीकरणाची यादी तयार 

आज-तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रुग्णालयात उपचारांसाठी लाखो रुपयांचे बिल द्यावे लागले होते. पण तरिही या पोलिसाच्या कुटूंबातील तीन व्यक्तींचा जीव वाचू शकला नाही. सगळ्यात आधी नयना रावल यांचा 17 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर वडील आणि भावालाही आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता धवल यांना कोणचाही आधार राहिलेला नाही. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.  रिअल हिरो! रुग्णालयाला लागली आग; अन् गर्भवती कुत्रीने जीवाशी खेळत वाचवले लोकांचे प्राण, पाहा फोटो

Web Title: Shocking news gujarat cop loses 3 family members to the virus in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.