Corona vaccine india one crore health workers to be vaccinated first | दिलासादायक! भारतात सगळ्यात आधी 'या' १ कोटी लोकांना कोरोनाची लस देणार; लसीकरणाची यादी तयार 

दिलासादायक! भारतात सगळ्यात आधी 'या' १ कोटी लोकांना कोरोनाची लस देणार; लसीकरणाची यादी तयार 

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी ठरत असलेली लस पुढच्या वर्षाच्या सुरूवातीपासून देशात उपलब्ध होऊ शकते. प्राथमिकतेच्या आधारावर एक कोटी फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी वर्गाची यादी तयार करण्यात आली आहे. लस उपलब्ध होताच सगळ्यात आधी या लोकांचे लसीकरण केले जाणार आहे.  द इंडियन एक्‍सप्रेसने सुत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार लसीचे वितरण, लसीकरण या व्यवस्थेसाठी तज्ज्ञांच्या गटाने एक कोटी लोकांची ड्राफ्ट यादी तयार केली आहे. यासाठी विविध राज्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील ९२ टक्के सरकारी रुग्णालयातील माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त ५६ टक्के खासगी रुग्णालयांमधून माहिती पुरवण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या एका गटाने  दिलेल्या माहितीनुसार आता लस एडवांस स्टेजमध्ये आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून फ्रंटलाईन कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाची वेगवेगळ्या गटात विभागणी केली जात आहे.

आपातकालीन स्थितीत कोरोना लसीचा वापर सुरू होणार? कोरोनाच्या वाढत्या प्रसारानं वाढली चिंता

यात एलोपेथिक डॉक्टर्स, आयुष डॉक्टरर्स, आशा वर्कर्स, एएनएम यांचा समावेश आहे. कारण लस ही संपूर्ण १ कोटी लोकांना दिली जाणार आहे. त्यात प्राथमिकता त्यांना दिली जाणार आहे. लसीकरणा कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी मेडिसिन आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा आणि फॅकल्टी मेंबर्सचा समावेश  असेल. 

जुलै २०२१ पर्यंत ४० ते ५० कोटी डोज मिळू शकतात. त्यानंतर  २०- २५ कोटी भारतीयांचे लसीकरण केले जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे. त्यांना सगळ्यात आधी लस दिली जाणार आहे. पुढच्या वर्षाच्या  जुलैपर्यंत संभाव्य लसीकरण  केले जाईल. 

भारतात लसीकरणाला सुरूवात होणार?; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्यात आधी कोणाला मिळणार लस

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात २१२ जागांवर लस तयार करण्यात येत आहे. या २१२ लसींपैकी १६४ लसी ह्या प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ११ लसी ह्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यामध्ये फायर-बायोएनटेक आणि अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपन्यांनी आपल्या कोविड-१९ व्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलचे निष्कर्ष जारी केले आहे. मॉडर्ना व्हॅक्सिन ९४.५ टक्के आणि फायझर-बायोएनटेक ९५ टक्के प्रभावी दिसून आली आहे. आता दोन्ही कंपन्या मान्यतेसाठी अर्ज करणार आहेत. त्यानंतर या वर्षअखेरीस यांच्या प्रॉडक्शनची सुरुवात होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona vaccine india one crore health workers to be vaccinated first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.