धक्कादायक...पोलीस हवालदाराच्या पत्नीवरच मित्राकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:36 IST2019-05-14T16:36:12+5:302019-05-14T16:36:40+5:30

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ऋषभदेव ठाण्यात सुरेश कन्हैयालाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking ... friend did rape on police constable's wife | धक्कादायक...पोलीस हवालदाराच्या पत्नीवरच मित्राकडून बलात्कार

धक्कादायक...पोलीस हवालदाराच्या पत्नीवरच मित्राकडून बलात्कार

निर्भया बलात्कार प्रकरणानंतर केंद्राने कायदा करूनही महिलांवरील अत्याचारावर चाप काही बसत नाहीय. राजस्थानमध्ये तर पोलिसाच्या पत्नीलाच लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने डुंगरपूर जिल्ह्यातील एका पोलिस हवालदाराच्या पत्नीलाच पोलिसांच्या वसाहतीतून उचलून नेत खेरवाडामध्ये बलात्कार केला आहे. 


पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ऋषभदेव ठाण्यात सुरेश कन्हैयालाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 मे रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये म्हटल्यानुसार पीडित महिला दोन वर्षांपूर्वी खेरवाडामध्ये शिकविण्यास जात असे. आरोपीदेखिल तेथे येत होता. या दरम्यान त्यांच्यामध्ये ओळख निर्माण झाली. तो तिच्याशी फोनवर बोलू लागला. याच दरम्यान आरोपीने तिचा अश्लिल फोटो काढला होता. या फोटोवरून तो तिला ब्लॅकमेल करत होता. धमकावून त्याने 40 हजार रुपये उकळले होते. 


पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये महिलेने सांगितले की, सात मे रोजी रिझर्व्ह पोलीस दलाच्या कॉलनीमध्ये जात कन्हैयाकुमारने तिला जबरदस्तीने खेरवाडाच्या पुढे राहणाऱ्या मित्राच्या घरी नेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही त्याने सर्वांना सांगण्याच्या धमकी देत बलात्कार करत होता. कन्हैयाकुमार गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहे. 

Web Title: Shocking ... friend did rape on police constable's wife