धक्कादायक! पेट्रोल पंपावर बाईकला अचानक आग, घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 11:03 IST2018-09-15T11:02:05+5:302018-09-15T11:03:02+5:30

तामिळनाडूतील एका तरुणाने पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर त्याने बाईक स्टार्ट केली असता अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून या घटनेत बाईकस्वार तरुण जखमी झाला आहे. 

Shocking CCTV Clip Shows Biker Catching Fire At Fuel Pump In Tamil Nadu | धक्कादायक! पेट्रोल पंपावर बाईकला अचानक आग, घटना सीसीटीव्हीत कैद

धक्कादायक! पेट्रोल पंपावर बाईकला अचानक आग, घटना सीसीटीव्हीत कैद

चेन्नई : जर तुम्ही पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असाल तर सावधानता बाळगा. कारण, असा एक व्हिडीओ समोर आला आहे की, तो पाहून तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल. तामिळनाडूतील एका तरुणाने पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर त्याने बाईक स्टार्ट केली असता अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून या घटनेत बाईकस्वार तरुण जखमी झाला आहे. 

तामिळनाडूमधील तिरुनेलवेली येथील एका पेट्रोल पंपावरील ही घटना आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये एक तरुणाने आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर लगेच बाईक स्टार्ट केली असता आग लागली. आग लागल्यानंतर लगेच तो तरुण घाबरुन बाईकवरुन खाली पडल्याचे दिसते. त्याचबरोबर, त्याच्या मदतीला पेट्रोल पंपावरील कर्मचारी धावून येताना दिसत आहेत.  


मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत बाईकस्वार तरुण जखमी झाला असून त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बाईकच्या पेट्रोलची टाकी लीक झाल्यामुळे ही आग लागली की, आणखी कशामुळे याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: Shocking CCTV Clip Shows Biker Catching Fire At Fuel Pump In Tamil Nadu