धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 12:29 PM2020-04-20T12:29:52+5:302020-04-20T12:34:07+5:30

एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत: च्याच मुलांना गोळ्या घातल्या आहेत. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Shocking! ... And the police opened fire on their own children, killing one and injuring three | धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

googlenewsNext

कैथल - भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हरयाणातील कैथलमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत: च्याच मुलांना गोळ्या घातल्या आहेत. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या एका अधिकाऱ्याने आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या दरम्यान एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या दोन्ही सुनादेखील यामध्ये जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी मुलगा आणि दोन्ही सूनांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटना घडल्यानंतर पोलीस अधिकारी फरार झाला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सतबीर सिंह असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. लॉकडाऊनमध्ये सतबीर यांची दोन मुलं आणि सुना त्यांच्याकडे राहण्यासाठी आल्या होत्या. रविवारी रात्री घरामध्ये चर्चा सुरू असताना त्यांच्यात काही कारणांमुळे वाद झाला. सतबीर यांचा दोन्ही मुलांशी वाद सुरू असताना अचानक त्यांनी आपल्या मुलांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर यावेळी दोन्ही मुलांच्या पत्नीदेखील तिथे पोहोचल्या. त्यांनी मध्यस्थी केली म्हणून त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक

Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...

CoronaVirus: आजपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल; थोडी सूट, काही निर्बंध

 

Web Title: Shocking! ... And the police opened fire on their own children, killing one and injuring three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.