धक्कादायक! ७५४ विमानांची तपासणी, निम्मी आढळली सदोष, ‘या’ कंपन्यांची सर्वाधिक विमाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:40 IST2026-02-06T12:39:33+5:302026-02-06T12:40:10+5:30

Indian Aviation Industry: गतवर्षी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेला भीषण अपघात आणि हल्लीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात यामुळे भारतातील हवाई वाहतुकीमधील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यामधील विमानांच्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Shocking! 754 aircraft inspected, half found defective, most of the aircraft of 'these' companies | धक्कादायक! ७५४ विमानांची तपासणी, निम्मी आढळली सदोष, ‘या’ कंपन्यांची सर्वाधिक विमाने

धक्कादायक! ७५४ विमानांची तपासणी, निम्मी आढळली सदोष, ‘या’ कंपन्यांची सर्वाधिक विमाने

गतवर्षी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्याविमानाला झालेला भीषण अपघात आणि हल्लीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात यामुळे भारतातील हवाई वाहतुकीमधील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यामधील विमानांच्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय विमान कंपन्यांकडे असलेल्या विमानांमधील निम्म्या विमानांमध्ये वारंवार दोष आढळून आल्याचे समोर आले आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यापासून सहा शेड्युल विमान कंपन्यांच्या ७५४ विमानांमध्ये वारंवार उदभवणाऱ्या समस्यांचं विश्लेषण करण्यात आलं. त्यामध्ये ३७७ विमानांमध्ये वारंवार दोष आढळूनन आले.

याबाबत संसदेला दिलेल्या लिखित माहितीमध्ये नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, या तपासणीदरम्यान, देशातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोच्या सर्वाधिक विमानांची पडताळणी करण्यात आली. ३ फेब्रुवारीपर्यंत इंडिगोच्या ४०५ विमानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४८ विमानांमध्ये वारंवार दोष उदभवत असल्याचे समोर आले.

याशिवाय एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या २६७ विमानांची तपासणी करण्यात आली. त्यामधील १९१ विमानांमध्ये वारंवार त्रुटी आढळून आल्या. हे प्रमाण तपासणी करण्यात आलेल्या विमानांपैकी सुमारे ७० टक्के एवढे आहे. आकडेवारीनुसार एअर इंडियाच्या १६६ विमानांपैकी १३७ विमानांमध्ये वारंवार बिघाड होत होते. तर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या १०१ विमानांपैकी ५४ विमानांमध्ये अशा प्रकारच्या समस्या दिसून आल्या.

या यादीमध्ये इतर विमान कंपन्यांचाही समावेश आहे. त्यात स्पाईसजेटच्या ४३ विमानांची तपासणी करम्यात आली. त्यातील १६ विमानांमध्ये वारंवार बिघाड झालेले दिसून आले. तर आकासा एअरच्या ३२ विमानांपैकी १४ विमानांमध्ये दोष दिसून आले.

ही माहिती समोर आल्यानंतर त्यावर एअर इंडियाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाईन्सने खबरदारी घेत आपल्याकडील विमानांच्या ताफ्याची व्यापक प्रमाणावर तपासणी केली होती. त्यामुळे निरीक्षणांचं प्रमाण वाढलं आहे.   

Web Title : चौंकाने वाला! 754 विमानों की जाँच में आधे दोषपूर्ण पाए गए: एयरलाइन विवरण

Web Summary : छह भारतीय एयरलाइनों के 754 विमानों में से लगभग आधे में बार-बार दोष पाए गए। इंडिगो और एयर इंडिया के विमानों में सबसे ज्यादा समस्याएँ थीं। एयर इंडिया ने कहा कि सक्रिय जाँचों से निष्कर्ष बढ़े।

Web Title : Shocking! Half of 754 Inspected Planes Found Defective: Airline Breakdown

Web Summary : Nearly half of 754 inspected aircraft from six Indian airlines showed recurring defects. IndiGo and Air India had the most planes with issues. Air India stated proactive checks increased findings.