शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजानं ‘तोफ’ का थरथरली? शिवसेनेचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 08:34 IST

पंतप्रधानांनी जुमलेबाजीतून बाहेर पडावं; शिवसेनेचा मोदींना सल्ला

मुंबई: मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? 22 विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली? असे प्रश्न शिवसेनेने पंतप्रधानांना विचारले आहेत. मोदींना हटवायचे की ठेवायचे याचा निर्णय जनता घेईल. भाजप, मोदी सरकारच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवताच शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण जनतेला सर्व समजते. 22 पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोफाही गढूळ पाण्याच्या पिचकाऱ्या सोडू लागल्या, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. ममता बॅनर्जींच्या व्यासपीठावर काल जे गेले ते सगळे लोकविरोधी, देशविरोधी किंवा चोर आहेत असे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बजावले आहे. विरोधकांची आघाडी पंतप्रधान मोदी यांनी इतकी मनावर घेण्याचे कारण नाही व ते सर्व एकत्र आले म्हणून त्यांची ‘लोकविरोधी’ ‘देशविरोधी’ अशी खिल्लीही उडविण्याचे कारण नाही. विरोधकांच्या महाआघाडीत असे अनेक चेहरे-मोहरे आहेत की, जे वाजपेयी व मोदींच्या राष्ट्रीय आघाडीत सामील झाले होते. स्वतः ममता बॅनर्जी वाजपेयी सरकारात मंत्री होत्या. चंद्राबाबू नायडू, डी.एम.के., फारुख अब्दुल्ला, शरद यादव, अरुण शौरी, यशवंत सिन्हा, गेगाँग अपांग हे लोक राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येत-जात राहिलेच आहेत. खुद्द मायावती यांनी भाजपला साथ दिली आहे. हे सर्व लोक तेव्हा देशविरोधी नव्हते, पण आज देशाचे शत्रू बनले. नितीशकुमार यांनी मोदी यांची साथ सोडली तेव्हा तेसुद्धा देशविरोधी झाले व पुन्हा त्यांनी मोदींना टाळी दिली तेव्हा तेच नितीशकुमार देशप्रेमी झाले. देशाच्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीने या जुमलेबाजीतून बाहेर पडले पाहिजे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने मोदींचा समाचार घेतला आहे.लोकशाहीत विरोधी आघाडीस महत्त्वाचे स्थान आहे व विरोधकांचा भडीमार पंतप्रधानांनी संयमाने सहन केला पाहिजे. मोदींचे सरकार हे काही देशाचे शत्रू नाही, पण आपले सरकार ‘अमर’ आहे या भ्रमातही त्यांनी राहू नये. निवडणुका लढवून जिंकण्याचा व सत्ता टिकविण्याचा त्यांना अधिकार आहे तसा सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण करून त्यांना पराभूत करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. सर्व काही जनता ठरवते. कालच श्री. मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. तशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. जम्मू-कश्मीरात भारतीय जनता पक्षाने लोकविरोधाची पर्वा न करता मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संधान बांधून सत्ता भोगली. सरकार त्यांनीच पाडले व मेहबुबा यांची भूमिका लोकविरोधी, देशविरोधी असल्याचा डांगोरा पिटायला सुरुवात केली. भाजप, मोदी सरकारच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवताच शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण जनतेला सर्व समजते. 22 पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोफाही गढूळ पाण्याच्या पिचकाऱ्या सोडू लागल्या. हे चित्र लोकशाहीला बरे नाही, पण सत्ताधारी बेभान झाले की, जे घडते तेच घडताना आम्ही पाहात आहोत, असं म्हणत शिवसेनेने मोदींवर शरसंधान साधलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाMamata Banerjeeममता बॅनर्जीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारRamdas Athawaleरामदास आठवले