शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

शिवराजसिंहांची खुर्ची धोक्यात? गृहमंत्री नरोत्तम मिश्रा अचानक दिल्ली रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 3:45 PM

नरोत्तम यांचा ग्वाल्हेरमधील दौरा आधीपासूनच ठरलेला होता. मात्र, दिल्लीतून फोन आल्याने ते तातडीने हा दौरा रद्द करून रवाना झाले आहेत. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि वरिष्ठ नेते सुहास भगत आधीपासूनच दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत.

भोपाळ : मध्य प्रदेशचे गृह आणि आणि आरोग्य मंत्री नरोत्तम मिश्रा सोमवारी दुपारी सर्व दौरे रद्द करून अचानक दिल्लीला रवाना झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय नेत्यांच्या आदेशानुसार नरोत्तम मिश्रा दिल्लीला गेल्याचे समजते आहे. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बदलाचा विचार केंद्रीय नेत्यांच्या मनात आहे. यामुळे मिश्रा यांना बोलाविण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

नरोत्तम यांचा ग्वाल्हेरमधील दौरा आधीपासूनच ठरलेला होता. मात्र, दिल्लीतून फोन आल्याने ते तातडीने हा दौरा रद्द करून रवाना झाले आहेत. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि वरिष्ठ नेते सुहास भगत आधीपासूनच दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. हे सर्वजण मध्य प्रदेशमध्ये मंत्रिमंडळविस्तारासाठी दिल्लीला गेलेले आहेत. सोमवारी सकाळी या मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार व 30 जूनला शपथविधी होणार अशी चर्चा होत होती. मात्र, दुपारी अचानकच ही घडामोड घडल्याने मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेहमीप्रमाणे शिवराजसिंह यांच्या जवळच्या आमदारांना स्थान देण्यासाठी ते आग्रही होते. मात्र, केंद्रीय नेत्यांनी या यादीतून पाच शिराज समर्थकांची नावे वगळल्याचे समजते आहे. तसेच पक्षाचे नेतृत्व मध्य प्रदेशमध्ये नेता बदलावर विचार करत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 

कारण काय? मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना फोडत काँग्रेसचे कमलनाथ सरकार भाजपाने पाडले होते. याची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. शिंदेंनी 22 आमदार भाजपात आणले होते. यामुळे प्रस्थापित विरोधात विस्थापित असे संतूलन बसविणे भाजपाच्या नेत्यांना कठीण झाले होते. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारही रखडला होता. आता हे संतूलन राखण्यासाठी मुख्यमंत्रीच बदलाचा विचार दिल्लीतील वरिष्ठांनी सुरु केला आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीत शिवराजसिंहांना सत्तास्थापनेत आलेले  अपयशही याला कारणीभूत आहे. शिवराजसिंह चौथ्यांदा मुख्यमंत्र राहिलेले आहेत. यामुळे पुढील निवडणुकीतही एकच चेहरा असल्यास मोठा फटका बसू शकतो असे पक्ष नेतृत्वाला वाटत आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सत्य स्वीकारा! CoronaVirus दोन वर्षे नाही जाणारा; अमेरिकेच्या मोठ्या डॉक्टरचा इशारा

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

India China FaceOff: चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश