शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे वावरतायत, ते विरोधकांना कुत्र्यांसारखे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 08:41 IST

संजय राऊतांची 'रोखठोक' टीका. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती, राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी दिलेला शाप अशा अनेक कारणांवरुन यावेळी संसदेचं हिवाळी अधिवेशन गाजलं. जया बच्चन यांच्या वक्तव्याची अद्यापही चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र परखड शब्दांत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत व राजकीय विरोधकांना ते रोज अपमानित करीत आहेत. देशात ‘Free and Fair’ असे काही उरलेच नाही. जया बच्चन यांनी राज्यसभेत संतापाने उभे राहून सरकार पक्षाला शाप दिला, त्याची चर्चा अजून सुरूच आहे असं ते म्हणाले.

"ऐतिहासिक इमारतही थरथरली असेल""लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संपूर्ण कफन ओढून सरकारी पक्षाने संसदेचे अधिवेशन संपवले आहे.  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या 12 राज्यसभा खासदारांचे निलंबन शेवटपर्यंत रद्द केले नाही. हे बारा खासदार शेवटपर्यंत संसद भवनासमोरील गांधी पुतळ्यापाशी बसून राहिले. लोकशाहीत विरोधकांच्या वर्तनावर नेहमी बोट दाखविले जाते, पण सत्ताधाऱ्यांचे वर्तन हे कितीही बेकायदेशीर असले तरी त्यांच्याकडे कोणी बोट दाखवीत नाही. राज्यसभेत जया बच्चन संतापाने थरथरत उभ्या राहिल्या व म्हणाल्या, ‘मी तुम्हाला शाप देत आहे. तुमचे बुरे दिन लवकरच सुरू होत आहेत. तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे चूक आहे. आमचा गळाच एकदाचा घोटून टाका. लोकशाही संपूर्ण खतम करा,’ असे बच्चन म्हणाल्या. तेव्हा संसदेची ती ऐतिहासिक इमारतही क्षणभर थरथरली असेल," असं संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात म्हटलं आहे.

ते चित्र विदारकविरोधी पक्षाचा इतका अवमान यापूर्वी कधीच झाला नसेल. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात अडकले. संसदेला वाऱ्यावर सोडले आणि लोकशाही संसद भवनासमोरील गांधी पुतळ्यापाशी उघडय़ावर पडली असे चित्र दिसले. ते विदारक होते.

विरोधकांना कुत्र्यासारखी वागणूकजुन्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत एक वाक्य कोरलेली पाटी होती. त्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत. ‘‘जो जो मी निर्वाचित जनप्रतिनिधींचे चाळे पाहतो तो तो मला माझ्या कुत्र्यांची जास्तच प्रशंसा करावीशी वाटते- – लामरटीन

यावर बाळासाहेब ठाकरे चिरुटाचा धूर सोडत म्हणत, ‘तुम्ही कुत्र्यांचा यात अपमान करीत आहात! माणसांपेक्षा ते एकनिष्ठ असतात!’ आज दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे वावरत आहेत. ते विरोधकांना कुत्र्यांसारखे वागवीत आहेत. पण दिल्लीचा इतिहास असे सांगतो, “Every dog has his days.” हे जगभरातील राजकारणात अनुभवण्यास येते. त्यावर भाजपचेच एक कोंडमारा झालेले मंत्री हळूच म्हणाले, “dog चे काय घेऊन बसलात. dog हा शब्द उलटा करून पहा, Every god has also his day!” तेच खरे आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतJaya Bachchanजया बच्चन