शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

शिवसेना, राष्ट्रवादीचा मदतीचा हात; मतदानावेळी विरोधकांचे पाच खासदार गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:11 IST

शिवसेनेच्या तिन्ही सदस्यांनी केलेला सभात्याग हा वेगळ््या मार्गाने हे सीएबी मोठ्या फरकाने संमत होण्याला मदतच झाली.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्या धोरणांना शिवसेना जीव तोडून सर्व अंगांनी विरोध करीत असला तरी सत्ताधारी भाजपच्या विधेयकांना विरोध करायची वेळ येते तेव्हा त्याची फूटपट्टी बदलून जाते. बुधवारी राज्यसभेत नागरिकत्व संशोधन विधेयक (सीएबी), २०१९ मतास ठेवले गेले तेव्हा संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत या शिवसेनेच्या सर्व तीन सदस्यांनी सभात्याग केला. या विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने लोकसभेत मतदान केले व महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी काँग्रेसने दिल्यानंतर शिवसेनेने १८० अंशात आपली भूमिका बदलली.

शिवसेनेच्या तिन्ही सदस्यांनी केलेला सभात्याग हा वेगळ्या मार्गाने हे सीएबी मोठ्या फरकाने संमत होण्याला मदतच झाली. हे विधेयक राज्यसभेत १२५ विरुद्ध ९९ मतांनी संमत झाले. प्रत्यक्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोआ) सदस्य संख्या आहे फक्त ९९. रालोआला पाठिंबा असलेले चार सदस्य गंभीर आरोग्य प्रश्नांमुळे गैरहजर असतानाही रालोआने जास्तीची २६ मते मिळवली. एवढेच पुरेसे नव्हते की काय राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वरिष्ठ सदस्य माजीद मेमन आणि वंदना चव्हाण हे दोघे सीएबीवर मतदान घेतले जात असताना गैरहजर होते.

मेमन हे आजारी असल्यामुळे तर वंदना चव्हाण घरी लग्नसमारंभ असल्यामुळे गैरहजर होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सभागृहात उपस्थित होते तरी इतर दोन सदस्यांनी गैरहजर राहून हे विधेयक सहज संमत होईल एवढी काळजी घेतली.बहुजन समाज पक्षाचे चारपैकी दोन सदस्य हे कोणतेही स्पष्टीकरण न देता गैरहजर राहिले आणि अशीच परिस्थिती तृणमूल काँग्रेसचे के. डी. सिंह हेदेखील गैरहजर होते.

राज्यसभेत सध्या २४० सदस्य असून पाच जागा रिक्त आहेत. अखिल भारतीय अण्णाद्रमुक (११), बिजू जनता दल (७), तेलगू देसम पक्ष (२) आणि इतर अनेकांनी हे विधेयक सहजपणे संमत होण्यासाठी भाजपला मदतीचा हात दिला होता आणि विरोधी आघाडीतील फुटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार