शिवसेना नेते संजय राऊतांनी घेतली टिकैत यांची भेट; ‘धनुष्यबाण’ कुणाला गारद करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:55 IST2022-01-14T09:54:48+5:302022-01-14T09:55:23+5:30

भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात ऐतिहासिक शेतकरी आंदोलन झाल्यानंतर राकेश टिकैत यांची जनमानसांमधील प्रतिमा चांगली आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut met Rakesh Tikait | शिवसेना नेते संजय राऊतांनी घेतली टिकैत यांची भेट; ‘धनुष्यबाण’ कुणाला गारद करणार?

शिवसेना नेते संजय राऊतांनी घेतली टिकैत यांची भेट; ‘धनुष्यबाण’ कुणाला गारद करणार?

-सुरेश भुसारी

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांची मुझफ्फरनगर येथे भेट घेतल्याने उत्तर प्रदेशातील हिंदुत्ववादी राजकारणाला पुन्हा वेगळी फोडणी मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या पदरात जाणाऱ्या उच्चवर्णियांमधील मतांची विभागणी शिवसेनेमुळे होऊ शकते परंतु संघटनात्मक आधार नसल्याने कुणाच्या भरवशावर धनुष्यबाण चालवायचे याची चाचपणी शिवसेना सध्या करत आहे. 

भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात ऐतिहासिक शेतकरी आंदोलन झाल्यानंतर राकेश टिकैत यांची जनमानसांमधील प्रतिमा चांगली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे शेतकरी आंदोलनाला वेगळी उंची मिळाली आहे. या प्रतिमेचा उपयोग शिवसेना करण्याचा प्रयत्न करणार आहे काय? याचीच चाचपणी करण्याचा खासदार संजय राऊत यांचा प्रयत्न आहे. 

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut met Rakesh Tikait