शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, कर्नाटक, हैदराबादमध्ये दोन गटात तणाव, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:00 IST2026-02-20T09:59:08+5:302026-02-20T10:00:52+5:30

Crime News: कर्नाटकमधील बागलकोट आणि हैदराबादमधील अंबरपेठ येते शिवजयंतीच्या मिरवणुकीवेळी दोन गटांमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाल्याने मिरवणुकांना गालबोट लागल्याच्या घटना घडल्या.

Shiv Jayanti procession disrupted, tension between two groups in Karnataka, Hyderabad, what happened? | शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, कर्नाटक, हैदराबादमध्ये दोन गटात तणाव, काय घडलं?

शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, कर्नाटक, हैदराबादमध्ये दोन गटात तणाव, काय घडलं?

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवारी देशभरात उत्साहात साजरी झाली. शिवजयंतीनमित्त अनेक ठिकाणी शिवप्रेमींनी मिरवणुका काढल्या. या दरम्यान, कर्नाटकमधील बागलकोट आणि हैदराबादमधील अंबरपेठ येते शिवजयंतीच्या मिरवणुकीवेळी दोन गटांमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाल्याने मिरवणुकांना गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती चिघळली नाही.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कर्नाटकमधील बागलकोटमध्ये शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोरून जात असताना वाद झाला. ही मिरवणूक मशिदीसमोरून जात असताना मशिदीतून एक दगड फेकण्यात आला असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला. त्यानंतर तणाव निर्माण होऊन दोन्ही गटांचे लोक आमनेसामने आले. मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

कर्नाटकप्रमाणेच तेलंगाणामधील हैदराबाद येथील अंबरपेठ येथेही शिवजयंतीच्या मिरवणुकीदरम्यान किरकोळ वाद झाला. येथेही पोलिसांनी परस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोरून जात होती, त्याचवेळी मशिदीमध्ये रमजानची नमाज सुरू होती. त्यामुळे मिरवणुकीतील मोठ्या आवाजात लावलेली गाणी आणि घोषणाबाजीवरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला हटवले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. य या घटनेत कुठलंही नुकसान किंवा हानी झाल्याचं वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

Web Title : कर्नाटक, हैदराबाद में शिव जयंती जुलूस में तनाव, माहौल बिगड़ा

Web Summary : कर्नाटक और हैदराबाद में शिव जयंती के जुलूसों में समूहों के बीच तनाव हुआ। मस्जिदों के पास जुलूसों के दौरान विवाद हुआ, लेकिन पुलिस के हस्तक्षेप से स्थिति बिगड़ने से बच गई। प्रार्थना के समय संगीत के कारण मामूली बहस हुई। अधिकारियों ने सुरक्षा बढ़ाई और अफवाहों के खिलाफ सलाह दी।

Web Title : Shiv Jayanti Processions Marred by Tensions in Karnataka, Hyderabad

Web Summary : Shiv Jayanti processions in Karnataka and Hyderabad faced tensions between groups. Disputes arose near mosques during processions, but police intervention prevented escalation. Minor arguments occurred due to music during prayer times. Authorities deployed security and urged against rumors.