शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

लघुशंकेला गेला तितक्यात पत्नी ओरडली अन्... सोनमने दाखवले १८ मिनिटांत कशी गेली राजा रघुवंशीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:32 IST

राजा रघुवंशी याची हत्या कशी झाली हे समजून घेण्यासाठी शिलाँग पोलिसांनी आरोपींना घटनेच्या ठिकाणी नेले होते.

Raja Raghuvanshi Crime Scene Recreation: मेघालयातील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी शिलाँग पोलीस सोहराच्या वेसाडोंग फॉल्समध्ये पोहोचले होते. आरोपींनी राजा कसे संपवले याचा पूर्ण सीन रिक्रिएट करण्यात आला. यावेी फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी उपस्थित होती. सोनम रघुवंशीसह सर्व आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आरोपी सोनम रघुवंशी आणि इतर तीन आरोपींनी १८ मिनिटांत एवढी मोठी घटना कशी घडवली हे जाणून घेतले.

पोलीस यंत्रणाच्या कडक सुरक्षेत आरोपींना राजा रघुवंशीची हत्या करण्यात आलेल्या ठिकाणी नेण्यात आलं. आरोपींनी राजाचा मृतदेह मेघालयातील इस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील चेरापुंजी येथे एका खड्ड्यात फेकला होता. संपूर्ण घटनाक्रम एसडीआरएफ आणि पोलिस पथकांच्या उपस्थितीत रिक्रिएट करण्यात आला. सोनमला येथे वेगळ्या वाहनातून आणण्यात आले तर इतर तीन आरोपींना दुसऱ्या वाहनातून आणण्यात आले. हत्येच्या दिवशी राज शिलाँगमध्ये उपस्थित नव्हता, त्यामुळे त्याला घटनेच्या ठिकाणी नेण्यात आले नाही.

शिलाँग पोलिसांनी २३ मे रोजी दुपारी २:१८ वाजता १८ मिनिटांत राजाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचा दावा केला होता. आरोपींना घटनास्थळी नेऊन ते कोणत्या मार्गाने वर आले, सगळ्यात आधी हल्ला कोणी केला, राजाची हत्या कशी झाली, मृतदेह कसा उचलला आणि खाली फेकला गेला आणि नंतर तेथून कसे पळून गेले हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातून पोलिसांना या घटनेबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

हत्येच्या दिवशी गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर राजाला लघुशंका करण्यासाठी जायचं होतं. तो दरीत लघवी करू लागला. त्याचवेळी सोनम आणि तीन आरोपी तिथे पोहोचले. त्यावेळी सोनम मोठ्याने ओरडून आरोपींना त्याला मारण्यास सांगत होती. त्यानंतर तिन्ही आरोपींनी धारदार शस्त्राने राजावर हल्ला केला. राजाची हत्या केल्यानंतर चौघांनी राजाचा मृतदेह उचलून सेल्फी पॉइंटवरून खाली फेकून दिला. लग्नानंतर राजा आणि सोनम २३ मे रोजी येथून बेपत्ता झाले होते. पोलिसांना २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला होता. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि तीन मित्रांसह शिलाँगमध्ये संपूर्ण घटनेचा कट रचला होता. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस