'कोणत्याही भारतीय कंपनीला ७५% शुल्क आकारले जाईल...' ट्रम्प यांच्या निर्णयावर शशी थरूर यांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:42 IST2026-01-15T16:39:58+5:302026-01-15T16:42:01+5:30
शशी थरूर यांनी अमेरिकेच्या शुल्काबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 'भारतीय कंपन्या इतक्या जास्त शुल्कासह अमेरिकेत निर्यात करू शकणार नाहीत',असे थरुर म्हणाले.

'कोणत्याही भारतीय कंपनीला ७५% शुल्क आकारले जाईल...' ट्रम्प यांच्या निर्णयावर शशी थरूर यांनी व्यक्त केली चिंता
मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये तमाव सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ लावण्याबाबत बोलले आहेत. परराष्ट्र व्यवहारावरील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अमेरिकेच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली.
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
शशी थरूर यांनी एएनआयला सांगितले की,सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या करांमुळे त्रास झाला आहे. काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, "७५ टक्के कर लागू केल्यास कोणतीही भारतीय कंपनी अमेरिकेला निर्यात करू शकणार नाही."
शशी थरूर यांनी अमेरिकेच्या टॅरिफवर चिंता केली व्यक्त
भारतावरील अमेरिकेच्या शुल्काबद्दल थरूर म्हणाले, "मला नेहमीच या शुल्कांबद्दल चिंता वाटत आहे, कारण भारतावर लादलेला सुरुवातीला २५ टक्के शुल्क ही एक समस्या होती. दरम्यान, आग्नेय आशियातील आमचे प्रतिस्पर्धी देश, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया आणि अगदी पाकिस्तान आणि बांगलादेश, यांना फक्त १५ ते १९ टक्के शुल्क आकारले जाते.
हे देश आमच्याशी श्रम-केंद्रित उद्योगांमध्ये स्पर्धा करत आहेत, यामध्ये रत्ने, दागिने, सीफूड, कोळंबी आणि चामडे यांचा समावेश आहे, हे आम्ही अमेरिकेला निर्यात करतो. आमचे प्रतिस्पर्धी देश या वस्तूंवर १५ ते १९ टक्के शुल्क आकारत असताना, भारत २५ टक्के शुल्क आकारत आहे, असे थरुर यांनी स्पष्ट केले.
भारतीय कंपन्या ७५% शुल्क भरू शकणार नाहीत
शशी थरूर म्हणाले की, "आम्हाला आधीच २५% शुल्काची समस्या भेडसावत आहे. रशियाच्या निर्बंधांमुळे शुल्कात आणखी २५% वाढ झाली आहे, यामुळे ते ५०% पर्यंत पोहोचले आहे. जर आपण इराणच्या निर्बंधांमुळे आणखी २५% शुल्क वाढवले तर ते ७५% पर्यंत पोहोचेल."
"७५% शुल्कामुळे कोणतीही भारतीय कंपनी अमेरिकेला निर्यात करू शकणार नाही, हे या टॅरिफ मागील सत्य आहे, असंही थरुर म्हणाले.