शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

शाहरुखने नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली? स्वामींच्या दाव्यावर मॅनेजर पूजा दादलानीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 6:15 PM

कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची नुकतीच सुखरुप सुटका झाली आहे. यापैकी सात अधिकारी मायदेशी परतले आहेत.

कतारच्या तुरुंगात असलेल्या ८ भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना सोडविण्यात बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानची मदत घेतल्याचा दावा भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यावर शाहरुख खान कडून खुलासा आला आहे. 

कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची नुकतीच सुखरुप सुटका झाली आहे. यापैकी सात अधिकारी मायदेशी परतले आहेत. भारतात परतल्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या माजी अधिकाऱ्यांनी सुटकेचं श्रेय दिले आहे. असे असताना सुब्रमण्यम स्वामी यांनी एका बॉलिवुड अभिनेत्याच्या मध्यस्थीमुळे या नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाल्याचा दावा केला आहे. 

परराष्ट्र मंत्रालय आणि एनएसए अयशस्वी ठरल्यानंतर बॉलिवुडचा बादशाहा शाहरुख खानला मोदींनी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. यानंतर आपल्या माजी अधिकाऱ्यांना सोडविण्यासाठी खूपच महागडी डील करण्यात आल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. यावर शाहरुख खानच्या टीमचे निवेदन आले आहे. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी हिने तिच्या इन्स्टावर ही पोस्ट केली आहे.

कतारमधून नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरुख खानचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा यात कोणताही सहभाग नाही, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. ही सुटका केवळ भारत सरकारमुळेच झाली आहे. खान यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे यात म्हटले आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षित परतण्यामुळे शाहरुखला आनंद झाल्याचेही यात म्हटले आहे.  

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खानSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीQatarकतार