शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

२०५० पर्यंत देशातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये गंभीर जलसंकट; प्रतिव्यक्ती पाण्याची मागणीही वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 7:32 AM

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात असलेल्या जलस्रोतांमुळे भारतात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार नाही

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे बदललेले ऋतुचक्र, भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा, जलपुनर्भरणाकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे २०५० पर्यंत भारतातील निम्म्याहून अधिक देशांमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषीक्षेत्रातील जलसंधारण क्षमता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका अहवालात हा धक्कादायक इशारा देण्यात आला. त्यामुळे पुढील २५ वर्षांमध्ये भारतातील प्रतिव्यक्तीच्या पाण्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. 

तांदूळ, उसासाठी वारेमाप वापरदेशात शेतीसाठी सर्वाधिक प्रमाणात पाणी वापरले जाते. भारतात उपलब्ध पाण्याचा ८० ते ९० टक्के हिस्सा शेतीसाठी वापरण्यात येतो. त्यानंतर घरगुती तसेच औद्योगिक कारणांसाठी पाण्याचा उपयोग केला जातो. तांदूळ, गहू, ऊस या तीन पिकांसाठी सर्वाधिक पाणी वापरले जाते. शेतीसाठी पाणी नीट वापरले गेले तर २० टक्के पाण्याची बचत होऊ शकते असेही या अहवालात म्हटले आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात असलेल्या जलस्रोतांमुळे भारतात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार नाही. ७६ टक्के लोकांकडे पुरेसे पाणी उपलब्ध नाही.  त्यामुळे देशापुढे पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण होण्याची भीती डीसीएम श्रीराम व सत्व नॉलेजच्या अहवालात म्हटले आहे.

१७% लोकसंख्या; ४% पाणीसाठाजगातील एकूण लोकसंख्येपैकी १७ टक्के लोक भारतात राहतात. जगातील एकूण पाणीसाठ्यापैकी केवळ ४ टक्केच पाणी भारतात उपलब्ध आहेत. प्रति व्यक्ती १,७०० क्युबिक मीटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध असेल तर त्या भागात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे असे फ्लेंकेनमार्क इंडेक्समध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपात