विमानाचे हवेत हेलकावे; सात प्रवाशांना मुकामार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 11:11 IST2023-05-18T11:11:25+5:302023-05-18T11:11:46+5:30

हे विमान सिडनीमध्ये सुखरूपपणे उतरविण्यात आले. 

Seven passengers were injured Aircraft in mid-air | विमानाचे हवेत हेलकावे; सात प्रवाशांना मुकामार

विमानाचे हवेत हेलकावे; सात प्रवाशांना मुकामार


नवी दिल्ली : एअर इंडियाचे दिल्लीहून ऑस्ट्रेलियातील सिडनीला जाणारे एक विमान बुधवारी हवेत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे हेलकावे खाऊ लागले. त्यामुळे विमानातील सात प्रवाशांना मुकामार लागत ते जखमी झाले. हे विमान सिडनीमध्ये सुखरूपपणे उतरविण्यात आले. 

एअर इंडियाच्या या विमानाने दिल्लीहून मंगळवारी उड्डाण केले. त्यावेळी त्याला बिघडलेल्या वातावरणाचा  सामना करावा लागला. यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या विमानातील सात प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर विमानातून प्रवास करणाऱ्या एका डॉक्टर व नर्सच्या साहाय्याने प्रथमोपचार करण्यात आले. या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही. एअर इंंडियाच्या या विमानात २२४ प्रवासी होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Seven passengers were injured Aircraft in mid-air