नैनितालमध्ये स्कूलबस दरीत कोसळून सात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 10:29 IST2023-10-10T10:28:42+5:302023-10-10T10:29:08+5:30

या अपघातात सातजण ठार झाले, तर २४ जण जखमी झाले.

Seven killed as school bus falls into Valley in Nainital | नैनितालमध्ये स्कूलबस दरीत कोसळून सात ठार

नैनितालमध्ये स्कूलबस दरीत कोसळून सात ठार

डेहराडून : एक शालेय बस रविवारी रात्री १०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात सातजण ठार झाले, तर २४ जण जखमी झाले. सर्व जखमींना हल्द्वानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये पाच महिला कर्मचारी आणि एका मुलाचा समावेश आहे.

कालधुंगी रोडवरील नालनीजवळ रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हरयाणाच्या हिसारमधील एका शाळेतील ३४ जण शनिवारी नैनितालला आले होते. रविवारी  परतताना  चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. पोलिस, एसडीआरएफने बचावकार्य केले.
 

Web Title: Seven killed as school bus falls into Valley in Nainital