Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 00:14 IST2025-10-13T00:12:06+5:302025-10-13T00:14:49+5:30
पश्चिम बंगालमधील बर्दवान रेल्वे स्थानकावर रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला.

Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
पश्चिम बंगालमधील बर्दवान रेल्वे स्थानकावर रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला. फूट ओव्हरब्रिजच्या पायऱ्यांवर एकाच वेळी अनेक गाड्यांमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने झालेल्या अपघातात किमान सात प्रवासी जखमी झाले.
ही घटना संध्याकाळी ५:१५ ते ५:२५ दरम्यान प्लॅटफॉर्म ४ आणि ५ ला जोडणाऱ्या फूट ओव्हरब्रिजवर घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, प्लॅटफॉर्म ४, ६ आणि ७ वर एकाच वेळी तीन गाड्या आल्या आणि प्रवाशांमध्ये धावपळ सुरू झाली. प्लॅटफॉर्म ५ वर हल्दीबारी एक्सप्रेस तर प्लॅटफॉर्म ४ वर हावडा मेन लाईन लोकल ट्रेन उभी होती. लोकल ट्रेनमध्ये एकाच वेळी प्रवासी चढत आणि उतरत असल्याने फूट ओव्हरब्रिजच्या पायऱ्यांवर प्रचंड गर्दी झाली. या गर्दीमुळे पायऱ्यांवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत सात जण जखमी झाले. जखमींवर बर्दवान मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
बर्धमान : रविवार शाम बर्धमान स्टेशन पर यात्रियों की भारी भीड़ के बीच बड़ा हादसा हो गया। ट्रेन पकड़ने की जल्दबाज़ी में मची भगदड़ में कम से कम 7 लोग घायल हो गए। सभी घायलों को बर्दवान मेडिकल कॉलेज अस्पताल में भर्ती कराया गया है, जहाँ उनका इलाज जारी है। pic.twitter.com/cFvvhTuiYu
— Syeda Shabana (@JournoShabana) October 12, 2025
या घटनेबाबत माहिती मिळताच, रेल्वे संरक्षण दल आणि रेल्वे पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना वाचवून तातडीने रुग्णालयात पोहोचवले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी, हा अपघात कसा घडला आणि नेमकी कारणे काय होती? याबाबत तपास सुरू आहे.