शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

भारतात आता लसीची कमतरता जाणवणार नाही; Serum देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 12:05 PM

Corona Vaccine : सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण यावरील एक उपाय मानला जात आहे.

ठळक मुद्देसध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण यावरील एक उपाय मानला जात आहे.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेवर ताणही येत आहे. दरम्यान, सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण हा यावरचा रामबाण उपाय मानला जात आहे. आजपासून देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. १८-४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण या टप्प्यात करण्यात येणरा आहे. अनेक राज्यांमधील अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे हे लसीकरण थोडं लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. परंतु लस उत्पादक कंपन्यांवरही काही मर्यादा आहेत. यादरम्यान, कोविशिल्ड (Covishield) या लसीचं उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी आता देशाच्या बाहेरही लस उत्पादन करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. "कंपनी इतर देशांमध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे," असं 'द टाइम्स'ला शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले. "येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा केली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सीरम इनस्टिट्यूट ऑफ इंडिया भारतात कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार सीरम इन्स्टिट्यूट जुलै महिन्यापर्यंत आपल्या लसीचे मासिक उत्पादन वाढवून १०० दशलक्ष डोसपर्यंत नेईल, असं अदर पूनावाला यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. यापूर्वी ही कालमर्यादा मे महिन्यापर्यंत सांगण्यात आली होती. सध्या अनेक राज्यांकडून लसीचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसंच यामुळे काही राज्यांमध्ये आजपासून १८-४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरणही होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, पुढील सहा महिन्यांमध्ये सीरम आपल्या लसींच्या उत्पादनाची क्षमता वर्षाला २.५ ते ३ अब्ज डोस इतकी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आज भारतात ४ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत