शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरा राजे समर्थकांचा राजस्थानात वेगळा मंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:39 IST

भाजपला धक्का, गटबाजी आणि असंताेष चव्हाट्यावर

जयपूर : राजस्थानमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्या समर्थकांनी स्वतंत्र गट स्थापन केला करून पक्ष नेतृत्वाला धक्का दिला आहे.

राजे समर्थकांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘टीम वसुंधरा राजे’ या नावाने वेगळा गट स्थापन केला. त्यामध्ये २५ जिल्हाध्यक्षांची घाेषणाही करण्यात आली असून ही यादी साेशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आली. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासाेबत राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, विराेधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया आणि उप विराेधी पक्षनेते राजेंद्र राठाेड यांची बैठक सुरू असतानाच या घडामाेडी घडल्या. या बैठकीसाठी वसुंधरा राजे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. राजे यांना हळूहळू बाजूला सारण्याचे काम सुरू असल्याचा आराेप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. राजस्थानमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये पाेटनिवडणूक हाेणार आहे. या नव्या समीकरणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना माेठा धक्का बसला आहे. वसुंधरा राजे समर्थक मंच या नावाने या नावाने हा गट स्थापन करण्यात आला आहे. त्याचे समन्वयक विजय भारद्वाज यांनी सांगितले, की २०२३ मध्ये भाजपला पुन्हा सत्तेत आणायचे असून, राजे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी काम करायचे आहे.

सावध प्रतिक्रियाप्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, की या घडामाेडींबाबत आम्ही वरिष्ठ नेत्यांना कल्पना दिली आहे. या गटाचे सदस्य खराेखर भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत का, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. सविस्तर अहवाल तयार केल्यानंतरच स्पष्टता येईल.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा