सचिनच्या प्रेमात अटक झालेली सीमा पाकिस्तानातून भारतात कशी पोहोचली? रहस्य उलगडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 17:23 IST2023-07-10T17:22:16+5:302023-07-10T17:23:04+5:30
Seema Haider Love Story : नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह...ऍ

सचिनच्या प्रेमात अटक झालेली सीमा पाकिस्तानातून भारतात कशी पोहोचली? रहस्य उलगडलं!
पाकिस्तानातील एक महिला भारतातील एका तरुणाच्या एवढी प्रेमात पडली, की तिने बेकायदेशीरपणे देशाची सीमा ओलांडून थेट भारतात प्रवेश केला. पाकिस्तानातील सीमा हैदर नावाची ही महिला PUBG खेळताना ग्रेटर नोएडाच्या सचिन नामक तरुणाच्या प्रेमात पडली आणि नंतर काय, तर तिने आपल्या 4 मुलांसह देशाची सीमा ओलांडली. यासंदर्भात, सुरक्षा यंत्रणांना सुगावा लागल्यानंतर, सीमा आणि सचिनला अटक करण्यात आली. यानंतर, या दोघांनाही देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मिळाला आहे. मात्र त्यांच्या लव्ह स्टोरी संदर्भात संपूरर्ण देशाला उत्सुकता आहे.
व्हिसा न मिळाल्याने अशी आली भारतात -
खरे तर, सीमा विवाहित आहे. तिचा नवरा दुबईत काम करतो. त्याच्यापासून तिला 4 मुले आहेत. पण, सचिनच्या संपर्कात आल्यानंतर तिने पाकिस्तानातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी व्हिसा न मिळाल्याने, ती नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली.
या अटीवर मिळाला जामीन -
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह झाला आहे. न्यायालयाने पत्ता न बदलण्याच्या आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर या दोघांना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी सचिनच्या वडिलांनाही जामीन मिळाला आहे. जेवर दिवाणी न्यायालयाच्या ज्यूनिअर डिव्हिजनचे न्यायाधीश नाजीम अकबर यांनी वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, त्यांना जामीन मंजूर केला.
सीमेवर कुणालाच शंका कशी आली नाही?
सीमा हैदरने झी मिडियासोबत बोलताना सांगितले की, सचिन आणि तिचे 2021 मध्येच नेपाळमध्ये लग्न झाले. सीमा हैदर कपाळावर कुंकू लावत असल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र घालत असल्याने कुणाला शंका आली नाही. ती नेपाळमार्गे आपल्या 4 मुलांसह बेकायदेशीरपणे भारतात आली. याचवेळी आपल्याला पाकिस्तानात जायचे नाही. तेथे आपल्या जीवाला धोका असल्याचेही सीमाने सांगितले.