इथं पाहा टाईमटेबल ...  CBSE बोर्डाच्या दहावी अन् बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 03:26 PM2020-05-18T15:26:42+5:302020-05-18T15:27:59+5:30

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख १ जुलै ते १५ जुलै याच कालावधीत असणार आहे. या कालावधीत कोणता पेपर कोणत्या दिवशी

See the schedule here ... CBSE Board announces timetable for 10th and 12th exams MMG | इथं पाहा टाईमटेबल ...  CBSE बोर्डाच्या दहावी अन् बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर 

इथं पाहा टाईमटेबल ...  CBSE बोर्डाच्या दहावी अन् बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर 

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर आज जाहीर करण्यात आलं. मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशांख यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर होईल, हेही त्यांनी यापूर्वी सांगितले होते.. मात्र, परीक्षांच्या वेळापत्रकाला अंतिमत: निश्चित करण्यासाठी काही तांत्रिक बाबींची खात्री करण्यात येणार असल्याने शनिवारऐवजी सोमवारी हे वेळापत्रक जाहीर झाले. 

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख १ जुलै ते १५ जुलै याच कालावधीत असणार आहे. या कालावधीत कोणता पेपर कोणत्या दिवशी होणार, याची माहिती आज वेळापत्रकाद्वारे देण्यात आली. त्यानुसार, बारावी आणि नॉर्थ दिल्लीत दहावीची परीक्षाही १ ते १५ जुलै या कालावधीतच होणार आहे. सीबीएसईच्या नवीन वेळापत्रकानुसार परीक्षांची वेळ सकाळी १०.३० ते १.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. १ जुलै रोजी ( होम सायन्स) देशभरात, २ जुलै रोजी (हिंदी) देशभरात, ३ जुलै रोजी (फिजिक्स) नॉर्थ ईस्ट दिल्ली, ४ जुलै रोजी (अकाऊंटन्सी ) नॉर्थ ईस्ट दिल्ली, ६ जुलै रोजी (केमस्ट्री), नॉर्थ ईस्ट दिल्ली, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर, ७ जुलै रोजी (कॉम्प्युटर सायन्स), इन्फॉर्मेशन टेकचे पेपर देशभरात होतील. तर, ८ जुलै रोजी इंग्रजी इलेक्टीव्ह एन आणि सी, इंग्लिश कोर (नॉर्थ ईस्ट दिल्ली), ९ जुलै रोजी बिझनेस स्टडी, १० जुलै (बायो) आणि ११ जुलै रोजी भुगोल (देशभर) पेपर होणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे १५ जुलै रोजी गणित, इकॉनॉमिक्स, इतिहास आणि बायोलॉजीचे पेपर होणार आहेत. 

केंद्रीय विद्यालयाच्या या परीक्षा कोरोना लॉकडाऊनमुळे तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या होत्या. सीबीएसई सचिव अनुराग तिवारी यांनी हा निर्णय जाहीर केला होता. म्हणजेच, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जेईई आणि नीट परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कारण, जेईई परीक्षा १८ जुलैपासून सुरु होत असून नीट २०२० परीक्षेचं नियोजन २६ जुलै २०२० रोजी करण्यात आलं आहे. 


 

Read in English

Web Title: See the schedule here ... CBSE Board announces timetable for 10th and 12th exams MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.