१८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांची सुरक्षा काढणार? महाराष्ट्रातील 'या' नेत्याचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:29 IST2025-01-02T12:29:07+5:302025-01-02T12:29:16+5:30

दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसंदर्भातील अहवाल तयार करुन केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे.

Security of 30 former ministers and MPs to be withdrawn report sent to Home Ministry | १८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांची सुरक्षा काढणार? महाराष्ट्रातील 'या' नेत्याचाही समावेश

१८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांची सुरक्षा काढणार? महाराष्ट्रातील 'या' नेत्याचाही समावेश

VIP security: दिल्ली पोलिसांनीगृह मंत्रालयाला काही माजी मंत्री आणि खासदारांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिस लवकरच गृहमंत्रालयाला १८ माजी राज्यमंत्री आणि १२ माजी खासदारांची यादी पाठवणार आहेत, ज्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांना सुरक्षा पुरवली जात आहे. केंद्र सरकारकडून मंत्री आणि खासदारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा वेळोवेळी घेतला जातो. दिल्ली पोलिसांनी ३० माजी आमदार खासदारांची  सुरक्षा काढायची की ठेवायची याबाबत निर्णय घेण्याची शिफारस केली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिस मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की सुरक्षा यंत्रणेने काही महिन्यांपूर्वी एक अहवाल तयार केला होता. ज्यामध्ये बऱ्याच लोकांना सुरक्षा कवच आहे आणि काहींना बऱ्याच काळापासून त्यांच्या पुरवण्यात आलेल्या सुरक्षेबाबत पुनर्विचार करण्यात आलेला नाही. “ऑडिटनंतर, अनेक लोकांचे सुरक्षा कवच काढून टाकण्यात आले पण असेही आढळून आले की अनेक राज्यमंत्री, खासदार आणि इतरांना त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही सुरक्षा पुरवण्यात आली  आहे,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

वृत्तानुसार, ऑडिट रिपोर्टमध्ये ज्यांची नावे आहेत त्यात वाय-श्रेणी सुरक्षा कवच असलेले माजी राज्यमंत्री भागवत किशनराव कराड, देवूसिंह चौहान, भानु प्रताप सिंग वर्मा, जसवंतसिंग भाभोर, जॉन बारला, कौशल किशोर, कृष्णा राज, मनीष तिवारी यांचा समावेश आहे. , पीपी चौधरी, राजकुमार रंजन सिंग, रामेश्वर तेली, एसएस अहलुवालिया, संजीव कुमार बल्यान, सोम प्रकाश, सुदर्शन भगत, व्ही मुरलीधरन, माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग आणि विजय गोयल यांचा समावेश आहे.

या यादीमध्ये  अजय भट्ट, अश्विनी कुमार चौबे आणि बिश्वेश्वर तुडू हे तीन राज्यमंत्री आहेत. त्यांना अद्याप वाय श्रेणी दर्जाचे सुरक्षा कवच आहे. ऑडिट रिपोर्टनुसार, सर्व माजी राज्यमंत्र्यांच्या घरी अजूनही तीन पीएसओ आणि चार पोलिस आहेत.
 
प्रक्रियेनुसार, नेत्यांना सुरक्षा त्याचे पद आणि त्याला असलेला धोका लक्षात घेऊन दिली जाते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्या सुरक्षेचा आढावा घेतला जातो. आढावा घेतल्यानंतर दिल्ली पोलीस अंतिम निर्णय घेण्यासाठी तो अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवतो. त्यानुसार गृहमंत्रालय संबंधित व्यक्तीला सुरक्षा पुरवायची की नाही याचा निर्णय घेते.

दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा ऑडिटमध्ये या नेत्यांची नावे

माजी मंत्री:
१) भागवत कराड
२) देवुसिंह चौहान
३) भानू वर्मा
४) जसवंतनह भाभोर
५) जॉन बार्ला
६) कौशल किशोर
७) कृष्ण राज
८) मनीष तिवारी
९) पीपी चौधरी
१०) राजकुमार सिंग
११) रामेश्वर तेली
१२) एसएस अहलुवालिया
१३) संजीव बल्यान
१४) सोम प्रकाश
१५) सुदर्शन भगत
१६) व्ही. मुरलीधरन
१७) विजय गोयल
१८) व्ही के सिंग

माजी खासदार:
१) गौतम गंभीर
२) अभिजित मुखर्जी
३) डॉ करण सिंग
४) मौलाना महमूद
५) नबा कुमार सरनिया
६) राम शंकर कथेरिया
७) के.सी. त्यागी
८) परवेश वर्मा
९) राकेश सिन्हा
१०) रमेश बिधुरी
११) विजय इंदर सिंगला
१२) अजय माकन

Web Title: Security of 30 former ministers and MPs to be withdrawn report sent to Home Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.