शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

दुसरं लग्न अवैध, पण जन्माला आलेल्या मुलाचा पेन्शनवर अधिकार, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:07 IST

न्यायालयाने या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्याची पहिली पत्नी आणि दुसऱ्या विवाहापासून झालेली आणि आता १५ वर्षांची असलेली मुलगी, या दोघींचीही नावे सर्व्हिस आणि पेन्शन बुकमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत...

अवैध संबंधातून अथवा घटस्फोटाशिवया केलेल्या दुसऱ्या विवाहातून जन्माला आलेल्या अपत्याचा आपल्या वडिलांच्या पेन्शनवर कायदेशीर अधिकार असेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. पूर्व रेल्वेमधील एका गेटमनच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला. महत्वाचे म्हणजे, भविष्यातही अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी हा निकाल मार्गदर्शक ठरू शकतो. न्यायालयाने या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्याची पहिली पत्नी आणि दुसऱ्या विवाहापासून झालेली आणि आता १५ वर्षांची असलेली मुलगी, या दोघींचीही नावे सर्व्हिस आणि पेन्शन बुकमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित कर्मचाऱ्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरा विवाह केला होता. पहिल्या पत्नीने तक्रार केली होती की, आपल्याला 'मिर्गी'चाआजार असल्याने पतीने सोडून दिले होते. त्याने आपल्याला न कळवता दुसऱ्या महिलेशी लग्न केले. शिवाय, ३१ डिसेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर, त्याने सर्व्हिस बुकमधून आपले आणि मुलाचे नाव हटवून, त्या जागी दुसरी पत्नी आणि तिच्या मुलीचे नाव टाकले. २०१२ पूर्वी आपला पोटगीचा एक खटला प्रलंबित होता. या खटल्यात, आपल्याला दरमहा १,००० रुपये मिळावेत असा आदेश देण्यात आला होता. ही तरतूद माझ्या मुलाच्या संगोपनासाठी करण्यात आली होती. 

संबंधित पत्नीने म्हटले आहे की, आम्ही वेगळे राहत असूनही घटस्फोट झाला नव्हता. पतीने २०१२ पासून आपल्याला कसलीही पोटगी दिलेल नाही. आपण प्रचंड अडचणीत जगत होतो.

संबंधित महिलेने पूर्व रेल्वेला एक निवेदन सादर केले होते, यासंदर्भात निर्णय देताना, "हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरे लग्न अवैध आहे. कायदेशीररित्या विवाहित असलेल्या पहिल्या पत्नीला आणि दुसऱ्या लग्नातून जन्मलेल्या मुलीला निवृत्तीवेतनाचे समान हक्क मिळतील," असे रेल्वेने म्हटले होते. मात्र, यानंतर, संबंधित व्यक्तीने वकिलाच्या माध्यमाने उच्च न्यायालयात धाव घेतली.

हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायमूर्ती कृष्ण राव यांनी स्पष्ट केले की, घटस्फोटाचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज सादर न केल्यामुळे पहिली पत्नीच कायदेशीररीत्या पेन्शनची हक्कदार आहे. जरी दुसरा विवाह कायद्याने अवैध असला, तरी त्या संबंधातून जन्माला आलेल्या अपत्यालाही वडिलांच्या संपत्तीवर आणि पेन्शनवर हक्क नाकारता येणार नाही. त्यामुळे दुसऱ्या पत्नीच्या मुलीचे नाव पेन्शनबुकमध्ये कायम ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Second marriage invalid, child entitled to pension: High Court

Web Summary : Kolkata High Court ruled a child from an invalid second marriage has a legal right to their father's pension. The first wife and child from the second marriage will be added to the service book.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhusband and wifeपती- जोडीदारPensionनिवृत्ती वेतन