सिंगापूरमध्ये शाळेला आग, पवन कल्याण यांचा मुलगा जखमी; लवकरच रवाना होणार आंध्रचे उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:28 IST2025-04-08T12:26:40+5:302025-04-08T12:28:59+5:30
पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत...

सिंगापूरमध्ये शाळेला आग, पवन कल्याण यांचा मुलगा जखमी; लवकरच रवाना होणार आंध्रचे उपमुख्यमंत्री
सिंगापूरमधील एका शाळेला लागलेल्या आगीच्या घटनेत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा जन सेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांचा छोटा मुलगा मार्क शंकर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. यानंतर, त्याल सिंगापूरमधील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पवन कल्याण निर्धारित कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सिंगापूरला जाणार -
पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी निर्धारित कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जन सेना पक्षाने एक्सवर लिहिले आहे की, "पवन कल्याण यांनी काल अराकू जवळील कुरिडी गावातील आदिवासी लोकांना भेटण्याचा शब्द दिला होता. ते आधी तेथे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील." याशिवाय, पोस्टमध्ये असेही म्हणण्यात आले आहे की, काही विकास योजना सुरू होणार आहेत. यामुळे हा दौरा संपवल्यानंतरच ते सिंगापूरला जातील. दौरा पूर्ण केल्यानंतर, ते विशाखापट्टनम येथे पोहोचतील आणि येथून सिंगापूरसाठी रवाना होतील.
స్కూల్లో అగ్ని ప్రమాదంలో చిక్కుకున్న శ్రీ @PawanKalyan గారి చిన్న కుమారుడు మార్క్ శంకర్
— JanaSena Party (@JanaSenaParty) April 8, 2025
•చేతులు, కాళ్ళకు గాయాలు... ఆసుపత్రిలో చికిత్స
•మన్యంలో పర్యటన ముగిసిన తరవాత శ్రీ పవన్ కల్యాణ్ గారు సింగపూర్ పయనం
రాష్ట్ర ఉప ముఖ్యమంత్రి శ్రీ పవన్ కల్యాణ్ గారి చిన్న కుమారుడు మార్క్…
अता कशी आहे मार्क शंकरची प्रकृती? -
जन सेना पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्क शंकर संदर्भात माहिती दिली आहे. शंकरला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्क शंकरचा जन्म 10 ऑक्टोबर 2017 रोजी झाला आहे. तो आता केवळ 8 वर्षांचा आहे असून सिंगापूरमध्ये शिकत आहे.