शाळा महाविद्यालय.. जोड
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
धनवटे नॅशनल कॉलेज
शाळा महाविद्यालय.. जोड
धनवटे नॅशनल कॉलेजफोटो स्कॅननागपूर : धनवटे नॅशनल कॉलेज येथे शैक्षणिक सत्र २०१५-२०१६ ला प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी कॉलेजचे विविध उपक्रम व विद्यार्थी उपयोगी विविध समित्यांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या अपेक्षा महाविद्यालयातर्फे पूर्ण करण्यात येतील असा विश्वास दिला. तत्पूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. कलाम आणि रा. सू. गवई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. पी.एस. चंगोले यांनी प्रास्ताविक केले. आय.क्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. आर.डी. भालेकर यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुराधा खेर्डेकर व आभार प्रदर्शन डॉ. पराग जोशी यांनी केले.सेंट्रल इंडिया कॉलेजफोटो स्कॅननागपूर : मेहमुदा शिक्षण व महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित सेंट्रल इंडिया कॉलेज, गोधनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपमहापौर मुन्ना पोकुलवार व सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक के.ए. मिश्रीकोटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ. अनिस अहमद व संजय देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. के.ए. मिश्रीकोटकर यांनी वृक्षारोपणाबाबतची सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाला चौधरी मॅडम व प्राचार्य विनय मानकर हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनजित साखरे यांनी केले. संजुबा हायस्कूलफोटो स्कॅननागपूर : रे स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय योगा स्पर्धेचे संजुबा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेतील विविध गटामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी १२ स्वर्ण पदकासह तब्बल ३० पदक जिंकले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेच्या संचालिका मोटवानी मॅडम, प्राचार्या पांडे मॅडम, पाटील सर, भागवतकर मॅडम, वैद्य मॅडम, राऊत मॅडम, क्रीडा शिक्षक चेतन घुले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.