लखनऊ- आगरा एक्स्प्रेस वेवर नऊ विद्यार्थ्यांना बसने चिरडलं, सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 09:46 AM2018-06-11T09:46:51+5:302018-06-11T09:46:51+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.

school children killed in bus accident on Agra-Lucknow expressway | लखनऊ- आगरा एक्स्प्रेस वेवर नऊ विद्यार्थ्यांना बसने चिरडलं, सात जणांचा मृत्यू

लखनऊ- आगरा एक्स्प्रेस वेवर नऊ विद्यार्थ्यांना बसने चिरडलं, सात जणांचा मृत्यू

कन्नोज- उत्तर प्रदेशच्या लखनऊ- आगरा एक्प्रेस वेवर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. कन्नोज येथे सकाळी झालेल्या अपघातात बसने नऊ शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलं. यामध्ये सहा विद्यार्थी व एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 



 

बसमधील डिझेल संपलं असल्याने विद्यार्थ्यांची बस थांबली होती. यावेळी एका बसने विद्यार्थ्यांना चिरडलं ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असल्याची माहिती मिळते आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपये व जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. 



 

Web Title: school children killed in bus accident on Agra-Lucknow expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.