शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

‘फ्युचर गेमिंग’ची १३६८ कोटींची रोखे खरेदी; TMCला ५४० कोटी, काँग्रेस किती कोटीचा लाभार्थी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:01 PM

Electoral Bond: वेदांत, भारती एअरटेल, मुथूट, बजाज ऑटो, जिंदाल ग्रुप आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या बड्या कंपन्यांकडून भाजपाला मोठा निधी मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

Electoral Bond: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज भारतीय स्टेट बँकेने विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांंशी संबंधित सर्व माहिती भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर काही तासातच निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध केली. 'फ्युचर गेमिंग' एकूण  १ हजार ३६८ कोटींची रोखे खरेदी केल्याची माहिती मिळाली असून, तृणमूल काँग्रेसला ५४० कोटींची देणगी दिल्याचे समोर आले आहे.

संपूर्ण तपशील उपलब्ध झाल्यामुळे आता कोणत्या देणगीदाराने कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या तारखेला किती निवडणूक निधी दिला हे उघड झाले आहे. एसबीायने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यासंदर्भातील माहिती जाहीर केली. वेदांत, भारती एअरटेल, मुथूट, बजाज ऑटो, जिंदाल ग्रुप आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या बड्या कंपन्यांकडून भाजपला मोठा निधी मिळाला आहे. वेदांत समूहाने भाजप काँग्रेस, बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसला, भारती एअरटेलने भाजप, राष्ट्रीय जनता दल, शिरोमणी अकाली दल, काँग्रेस, जनता दल (संयुक्त) यांना तर मुथूट यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांना देणग्या दिल्या. 

तृणमूल काँग्रेस 'फ्युचर गेमिंग'चा सर्वात मोठा लाभार्थी

'फ्युचर गेमिंग' ने देशभरातील बहुतेक राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत. ५४० कोटी रुपयांची देणगी मिळविणारा तृणमूल काँग्रेस 'फ्युचर गेमिंग'चा सर्वात मोठा लाभार्थी आहे. भाजप, काँग्रेस, द्रमुक, वायएसआर काँग्रेस या पक्षांनाही राजकीय देणग्या देण्यात आल्या आहेत.

सिक्कीममधील राजकीय पक्षांना १० कोटींपेक्षा कमी रक्कम

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या 'फ्यूचर गेमिग'ने १,३६८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. या कंपनीने द्रमुकला ५०९ कोटी, वायएसआर काँग्रेसला १६० कोटी, भाजपला १०० कोटी आणि काँग्रेसला ५० कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या सिक्कीममधील राजकीय पक्षांना १० कोटींपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे.

शिवसेनेला २५ कोटी रुपये दिले

हैदराबादस्थित मेघा इंजिनिअरिंग हा दुसरा सर्वांत मोठा देणगीदार आहे. कंपनीने १९६६ कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले असून भाजप, भारत राष्ट्र समिती आणि द्रमुक त्याचे लाभार्थी आहेत. 'क्विक सप्लाय' या कंपनीने ४१० कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले असून भाजपला ३९५ कोटी आणि शिवसेनेला २५ कोटी रुपये दिले, 'क्विक सप्लाय'च्या कार्यालयाचा नोंदणीकृत पत्ता नवी मुंबईतील चीरूभाई अंबानी नॉलेज सिटी येथील आहे.

दरम्यान, उद्योगपती लक्ष्मी निवास मित्तल यांनी भाजपला देणगी दिली, तर बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांनी भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला देणगी दिली. रुंगटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडने काँग्रेस, भाजपा, तृणमूल काँग्रेस आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला देणगी दिली. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाState Bank of Indiaस्टेट बॅक ऑफ इंडिया