शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 13:26 IST

SBI Mobile ATM: यासाठी इंटरनेटवर 'SBI ATM  near me' टाईप करण्याची किंवा एटीएम केंद्रात जाण्याची गरज नाही. एक मेसेज किंवा कॉल केल्यास एसबीआय मोबाील व्हॅन दारात येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरच्या महामारीमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एसबीआय (SBI) ने एक भन्नाट कल्पना लढविली आहे. पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीय. SBI ATM तुमच्या दारी येऊन पोहोचणार असून स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) या योजनेला सुरुवातही केली आहे. 

यासाठी तुम्हाला इंटरनेटवर 'SBI ATM  near me' टाईप करण्याची किंवा एटीएम केंद्रात जाण्याची गरज नाही. तर केवळ एक व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मेसेज केल्यावर एसबीआयचे मोबाईल एटीएम तुमच्या दारात येऊन पोहोचणार आहे. 

स्टेट बँकेचे लखनऊचे मुख्य व्यवस्थापक जय कुमार खन्ना यांन याबाबतचे ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लखनऊ सर्कलमध्ये SBI WhatsApp आणि SBI phone call service सुरु केल्याची घोषणा केली आहे. एसबीआयची ही योजना यशस्वी झाल्यास देशभरातील अन्य शहरामध्येही राबविली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ही सेवा सुरु करण्यात येत असल्याचे खन्ना म्हणाले. यासाठी एसबीआयला एक WhatsApp message किंवा एसबीायच्या नंबरवर फोन करावा लागणार आहे. पुढचे काम आम्ही करणार आहोत, असे खन्ना म्हणाले. जर लखनऊमध्ये शनिवारी, रविवारी लॉकडाऊन असेल आणि एटीएममधून पैसे काढायचे असतील तर निश्चिंत रहा, तुमच्याकडे एसबीआय एटीएमची मोबाईल व्हॅन येईल, असे ते म्हणाले.

यासाठी त्यांनी मोबाईल नंबरही दिला असून 7052-911-911 यावर नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठविण्याचे आवाहन त्यांनी केला आहे. तसेच सोसायटीही रजिस्टर करता येणार आहे. महिला आणि वरिष्ठ नागरिकांसाठी प्रामुख्याने ही सुविधा देण्यात येत आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले

अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

शिबू सोरेन यांना कोरोना; झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही होणार टेस्ट

सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला ''लवकरच अटक होणार''

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाatmएटीएमWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप