To Save Extramarital Affair, Kerala Mother Smashes Baby Against Rocks, Repeats Act to Ensure Death | ही कसली आई?... बाळाला खडकावर आपटून मारलं; कारण वाचून डोकंच फिरेल!

ही कसली आई?... बाळाला खडकावर आपटून मारलं; कारण वाचून डोकंच फिरेल!

ठळक मुद्देजन्मदात्या आईनेच आपल्या दीड वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली आहे.22 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान तिने मुलाची हत्या केल्याची कबुली दिलीअनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाची खडकावर डोकं आपटून हत्या केली.

कन्नूर - केरळच्या कन्नूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दीड वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान तिने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरन्या असं महिलेचं नाव असून तिने अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाची खडकावर डोकं आपटून हत्या केली आणि नंतर मुलाचा मृतदेह समुद्रात फेकून दिला. सुमद्र किनाऱ्यावर चिमुकल्याचा मृतदेह आढळल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्या कन्नूरमध्ये राहते. पती प्रणवसोबत पटत नसल्याने ती त्याच्यापासून वेगळी राहत होती. मुलाला भेटण्यासाठी प्रणव घरी आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी मुलगा घरी नव्हता. त्यामुळे पतीला थोडा संशय आला. प्रणवने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे सरन्याने मुलाच्या गायब होण्यामागे पतीचा हात असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास केला असता सरन्या आणि तिचा पती प्रणव हे दोघेही वेगवेगळी माहिती देत असल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी या दोघांची स्वतंत्रपणे विचारपूस करण्यास सुरुवात केली. 

सरन्याचा पती हा तीन महिन्यांनंतर आपल्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी मुलगा आणि आई एकत्र झोपले असल्याची माहिती त्याने तक्रारीत दिली. तर सरन्याने मुलगा वडिलांसोबत होता अशी माहिती पोलिसांना दिली. दोघांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना अधिक संशय आला. त्यानंतर त्यांनी दोघांची स्वतंत्र उलटतपासणी घेतली. कसून चौकशी केली असता सरन्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. सरन्याचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. त्याच्यासोबत राहण्यासाठी तिने मुलाची हत्या केल्याची माहिती दिली. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. 

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्र किनाऱ्या शेजारी सरन्याचं घर आहे. प्रणव मुलाला भेटण्यासाठी घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी तिने मुलाला घराबाहेर नेले आणि समुद्रकिनारी नेऊन त्याला मारण्याच्या हेतून पाण्यात फेकलं. मात्र यामुळे मुलगा जोरजोरात रडू लागला. तिने रडणाऱ्या मुलाला पुन्हा घेतले आणि खडकावर त्याचं डोकं आपटलं. यानंतरही मुलगा जिवंत असल्याचं लक्षात आल्यावर तिने पुन्हा त्याला खडकावर आपटलं आणि समुद्रात फेकून दिलं. बाळाच्या शवविच्छेदन अहवालानुसार, डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला आहे. सरन्याने अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरन्याला अटक केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू 

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

कमल हासनच्या इंडियन 2च्या सेटवर भीषण अपघात, तीन ठार

राम मंदिर उभारणीला १५ दिवसांत येणार वेग, २0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?

 

English summary :
To Save Extramarital Affair, Kerala Mother Smashes Baby Against Rocks, Repeats Act to Ensure Death

Web Title: To Save Extramarital Affair, Kerala Mother Smashes Baby Against Rocks, Repeats Act to Ensure Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.