शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

नराधम संजय रॉय दोषी, महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; उद्या शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 06:30 IST

महिला डॉक्टरबाबत अमानुष प्रकार घडल्यानंतर १६२ दिवसांनी हा निकाल आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती अनिर्बन दास यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. 

कोलकाता : येथील आर. जी. कार वैद्यकीय रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याला सोमवारी शिक्षा सुनावणार आहे. या बलात्कार, हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, या मागणीसाठी डॉक्टरांनी प्रदीर्घ आंदोलन केले होते.महिला डॉक्टरबाबत अमानुष प्रकार घडल्यानंतर १६२ दिवसांनी हा निकाल आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती अनिर्बन दास यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. 

कार रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट २०२४ रोजी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रॉयला अटक केली. न्या. दास यांनी सांगितले की, संजय रॉयने महिला डॉक्टरवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. सीबीआयने केलेल्या तपासात आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. सोमवारी त्याला शिक्षा सुनावली जाईल. (वृत्तसंस्था)

काय म्हणाला आरोपी रॉय?दोषी ठरवलेल्या संजय रॉय याने सांगितले की, माझ्यावर खोटे आरोप दाखल करण्यात आले आहेत. मी गळ्यात रुद्राक्षाची माळ घालतो. मी गुन्हा केला असता तर ही माळ तुटली असती. या प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्याचा हात आहे, असा आरोपही त्याने केला. 

हत्येत आणखी काही लोकांचा हात...निकालाबद्दल महिला डॉक्टरच्या पालकांनी न्याययंत्रणेचे आभार मानले आहेत. माझ्या मुलीच्या हत्येत आणखी काही लोकांचा हात असून त्यांना अटक झालेली नाही, असे महिला डॉक्टरच्या आईने सांगितले. या आरोपांची चौकशी करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे. 

निकालाला आव्हान देणार नाही : बहीणसंजय रॉयच्या मोठ्या बहिणीने निकालाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार नसल्याचे सांगितले. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल