संभल हिंसाचार पीडितांना सपाने केली 5 लाख रुपयांची मदत, भाजपवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:51 IST2024-12-30T15:49:47+5:302024-12-30T15:51:13+5:30
समाजवादी पक्षाने संभलमधील पीडित कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली आहे.

संभल हिंसाचार पीडितांना सपाने केली 5 लाख रुपयांची मदत, भाजपवर साधला निशाणा
Sambhal Violence : उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचाराने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच, राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सपाच्या शिष्टमंडळाने संभलमध्ये पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना धनादेश सुपूर्द केला.
#WATCH | Uttar Pradesh: Samajwadi Party delegation visits Sambhal and hands over a cheque of Rs 5 lakh each to the kin of those killed in the incident that took place in Sambhal, on 24 November. pic.twitter.com/Or6X6JPNla
— ANI (@ANI) December 30, 2024
खासदारावर चुकीचा गुन्हा दाखल : माता प्रसाद
सपाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे म्हणाले की, आम्हाला संभलमध्ये यापूर्वीच यायचे होते, पण आम्हाला प्रशासनाने येऊ दिले नाही. पोलिसांनी सपाचे खासदार जिया उर रहमान बुर्के यांच्याविरुद्ध संभल हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माता प्रसाद म्हणाले की, खासदार झिया उर रहमान यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले पूर्णपणे चुकीचे आहेत.
24 नोव्हेंबरला झालेला हिंसाचार
संभलच्या शाही जामा मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर मशिदीत सर्वेक्षण करण्यात आले हो24 नोव्हेंबर रोजी सर्वेक्षण पथक मशिदीच्या आत असताना मशिदीबाहेर हिंसाचार झाला. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, गोळीबार केला आणि वाहनेही जाळली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 50 आरोपींना अटक केली आहे.