तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:03 IST2025-11-27T17:03:23+5:302025-11-27T17:03:54+5:30
Samay Raina : स्पाइनल मस्क्युलर अट्रॉफी आजाराने ग्रस्त लोकांची खिल्ली उडवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश.

तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
Samay Raina : सर्वोच्च न्यायालयात आज स्टँड-अप कॉमेडियन समय रैना प्रकरणाची सुनावणी झाली. स्पाइनल मस्क्युलर अट्रॉफी (SMA) ग्रस्त व्यक्तींची खिल्ली उडवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शो आयोजित करण्याचा आदेश दिला आहे.
क्युर SMA इंडिया फाउंडेशनची याचिका
क्युर SMA इंडिया फाउंडेशन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, इतर कंटेंट क्रिएटर्सनीही, त्यांच्या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना सहभागी होण्यासाठी आमंत्रण द्यावे.
Supreme Court orders Samay Raina, others to host programs to raise funds for disabled persons
— Bar and Bench (@barandbench) November 27, 2025
Read here: https://t.co/LETL0Jnnyipic.twitter.com/kxBzL1U3zF
याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिल अपराजिता सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, या जोकमुळे SMA ग्रस्त मुलांची खिल्ली उडवली गेली. ही मुले अत्यंत गुणी आणि कुशल आहेत. अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर नकारात्मक टिप्पणी केल्यामुळे क्राउडफंडिंग आणि मदत मिळवणे अवघड होते.
पैसा नको, सन्मान हवा
न्यायालयाने सुनावणीत म्हटले की, या आजाराने ग्रस्त लोकांना तुमचे पैसे नकोत; त्यांना गरज आहे मान-सन्मानाची. कोर्टाने रैना आणि इतर कॉमेडियन्सना आपल्या प्लॅटफॉर्मचा उपयोग या मुलांच्या कौशल्ये आणि उपलब्धी दाखवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अनेक कॉमेडियन्सवरही आदेश लागू
सुप्रीम कोर्टाने ज्यांना हा विशेष शो आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यात समय रैना, विपुल गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर, आदित्य देसाई, निशांत जगदीप तंवर यांचा समावेश आहे.
काय आहे आरोप?
समय रैनाने त्याच्या एका स्टँड-अप शोमध्ये स्पाइनल मस्क्युलर अट्रॉफी या अनुवांशिक आजाराने पीडित लोकांवर चोक केला होता. या आजारामुळे स्नायूंमध्ये कमजोरी व क्षय निर्माण होतो. प्रभावित कुटुंबीयांच्या मते, या जोकमुळे SMA ग्रस्त मुलांचा अपमान आणि त्यांना मोठा मानसिक त्रास झाला.